भारताची शस्त्रसिद्धता किती मागे पडली आहे यावर पूर्वीही अनेकदा लेख लिहिले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण ही गोष्ट चर्चेचा नवा विषय नाही. पारंपरिक युद्ध क्षमता, शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण, रस्ते, रेल्वेमार्ग बांधणे आणि सर्व शस्त्रे – रणगाडे, तोफा आणि इतर शस्त्रास्त्रे यांचे मेक इन इंडिया अंतर्गत आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. […]
कोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे सुचवली ,पण इतक्या थोर व्यक्ती जास्त बिझी असणार तर येणार नाहीत म्हणून मग किरकोळ , सर्वसामान्य व्यक्तीचा आत्मा बोलवावा म्हणजे लवकर येईल व शक्यतो नात्यातील असेल तर लवकर येईल या कल्पनेने माझ्या आजोबांचा आत्मा बोलावण्याचे ठरले ते नैसर्गिकरित्या मरण पावले होते . […]
….सरांच्या मागोमाग सर्वानी प्रार्थना म्हंटली मग सरांनी हीच प्रार्थना फळ्यावर लिहिली व म्हणाले ” मित्रानो , आता आपण सगळ्यांनी जी प्रार्थना म्हंटली ती प्रार्थना अल्कोहोलिक्स एनाॅनिमसच्या प्रार्थनेवरून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मराठीत रुपांतरीत केली आहे..तिचा सखोल आणि सविस्तर अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत ” […]
एका पुस्तकात ‘प्लँचेट’ म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते… हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती, म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट, स्टीलचे पाणी पिण्याचे फुलपात्र, खडू, उदबत्ती आणि तीन जण . […]
प्लान ठरला आणि आम्ही सर्व आसपास लपलो फक्त होळी जळत होती आणि होळीजवळ तो प्राण ची नक्कल करणारा उताणा अंगावर कांबळे घेऊन पडला होता सुधाकर येण्याची चाहूल लागली तसे शिटी वाजवून इशारा दिला आणि तो मुलगा हळूच उठून उभा राहिला इकडे सुधाकरची बोबडी वळलेली , भ ..भू .भूत असे म्हणत तो पळत सुटला… […]
मी स्वतची ओळख करून देताना नाव.. .गाव ..सांगून झाल्यावर व्यसन कोणते ते सांगताना सरळ सरळ दारू असे न म्हणता ‘ ड्रिंक ‘ असे म्हंटल्यावर सगळेजण का हसले ते मला समजेना ..त्यावर एकजण ‘ कोणते ड्रिंक ? थम्सअप की लिम्का ? असेही ओरडला परत सगळे हसले ..मला कसेतरीच झाले ..परत जागेवर येऊन उभा राहिलो . […]
गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात आणि एकच एक दृष्य, फोटो सतत दाखवली जातात. या प्रकारचे वृत्तांकन थोडक्या शब्दांत न करता सतत तेच ते दाखवून त्यात तेल ओतण्याचे काम का केले जाते?.हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे. […]
माझे वडील रेल्वेत नोकरीस होते व आम्ही सुमारे २० वर्षे नाशिकरोड येथे रेल्वे क्वार्टर मध्ये राहत होतो . तेथे फक्त एकदोन कुटुंबे ब्राह्मणांची होती इयत्ता पहिली पासून मला आसपास खेळण्यासाठी सर्वच जातीधर्मातील मित्र मिळाले, समाजात खोल वर पसरलेला जातीभेद मी तेव्हापासून अनुभवतो आहे तेथे एखाद्या मुलाचा त्याच्या माघारी त्याचा उल्लेख तो गवळ्याचा , तो न्हाव्याचा , धनगराचा , बामनाचा , वाण्याचा असाच होत असे अर्थात प्रत्यक्ष त्या व्यक्तीसमोर असा उल्लेख क्वचितच होई … […]
टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ..टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ्र्र्र्र्र..कर्कश्य आवाजात तिसर्यांदा बेल वाजली तेव्हा मी वैतागून तोंडावरचे पांघरून काढले अन डोळे उघडले ….आसपास बहुतेक लोक उठलेले होते .मी भिंतीवरच्या घड्याळात पहिले सकाळचे साडेपाच झाले होते ..बापरे इतक्या लवकर उठायचे ? आसपासचे लोक उठून आपापल्या चादरी घडी करण्यात आणि गाद्या गुंडाळून ठेवण्यात गुंग झाले होते ..मी काल रात्री सुमारे आठ वाजता जो गोळ्या […]
अनेक प्रकारच्या अध्यात्मिक पुस्तकातून अश्या प्रकारचा अनुभव अध्यात्मिकतेकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना अश्या प्रकारचा मात्र थोडा वेगळा अनुभव आलेला आहे असे नमूद केलेले आढळले, मी त्या काळात व्यसने करीत होतो त्या मुळे मी अध्यात्मिक वैगरे असण्याचा प्रश्नच नव्हता, एक खरे की व्यसने बंद करण्याचा माझा निर्णय त्या काळापुरता तरी खूप प्रामाणिक होता व व्यसन न केल्यामुळे आलेली अस्वस्थता व बैचेनी घालवण्यासाठी मी जे पुस्तक वाचावयास घेतले होते ते अध्यात्मिक होते. […]