रात्री उशिरा केबिनच्या पोर्ट होल वर टक टक टक आवाज करत आहे असे वाटत होते . जहाज इस्तंबूल सोडून काळया समुद्रातून रशियाच्या दिशेने निघाले होते. रात्री आठ ते बाराचा वॉच संपवून केबिन मध्ये आल्या आल्या झोप लागली होती. पण पोर्ट होल वरच्या टक टक ने जाग आली. बाहेर बघितले तर काही दिसत नव्हते, समुद्रात जहाज जात […]
शकीरा च्या स्पॅनिश गाण्यांची एक डीवीडी आमच्या जहाजाच्या मेस रूम कम स्मोक रूम मध्ये होती. मेस रूम कम स्मोक रूम कारण बहुतेक जहाजांवर या दोन्ही रूम्स वेगवेगळ्या असतात. पण या जहाजावर मध्ये एक सोफा सेट करून पार्टिशन केले गेले होते. शकीराचे स्पॅनिश गाण्यांचे कलेक्शन असणारी डीवीडी तिच्या छोट्या मोठ्या कॉन्सर्ट चे रेकॉर्डींग पैकी होती. ती डीवीडी […]
माझे पहिले जहाज ब्राझिलच्या किनारपट्टीवर आणि अमेझॉन नदीमध्ये असलेल्या पोर्ट मध्ये ये जा करायचे. ब्राझिलच्या सागरी हद्दीत तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ जहाज थांबू शकत नसे कारण तसे केल्यास जहाजाला ब्राझिल मध्ये स्थानिक जहाज म्हणून रजिस्टर करावे लागले असते. तीन महिने पूर्ण व्हायच्या आत जहाज जर ब्राझिलच्या दक्षिण भागात असेल तर खाली उरुग्वे मध्ये जवळच्याच मॉन्टेविडियो या […]
एतीहाद एयर वेज चे मुंबई अबू धाबी आणि अबू धाबी ते पॅरिस असे फ्लाईट होते. पुढे पॅरिस हून मार्सेली नावाच्या छोट्याशा विमानतळावर एयर फ्रान्स चे अर्ध्या तासाचे फ्लाईट होते. मार्सेली एअरपोर्ट वरून अर्धा पाऊण तास ड्राईव्ह केल्यावर फ्रान्सच्या लवेरा या पोर्ट मध्ये जहाजावर जॉईन केले. जॉईन केल्या केल्या जहाज ब्लॅक सी च्या दिशेने निघाले. रात्री नऊ […]
हो मी अलिबागवरूनच आलोय. बाबांची अलिबागला बदली झाल्याने दहावी झाल्यानंतर नेरूळ सोडायला लागले होते. नेरूळच्या सेंट झेवियर्स मराठी शाळेतच फक्त सलग चार वर्ष शिकायला मिळाले होते. गावातली जिल्हा परिषद शाळा, मनमाड, मालेगाव, श्रीवर्धन इथल्या शाळांमध्ये एक एकच किंवा फार फार तर दोन वर्ष शिकायला मिळाले होते. नेरुळच्या शाळेत भरपूर मित्र होते पण दहावी नंतर फेसबुक येईपर्यंत […]
कळायला लागल्यापासून आठवतो तो म्हणजे आमच्या आईच्या माहेरी असलेला समुद्र. मुंबईच्या विरुद्ध किनाऱ्यावर वसलेले मांडवा गाव जे हल्ली मांडवा बंदर म्हणूनच ओळखले जाते. मांडव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घालवलेले बालपण आणि शाळेतल्या मोठ्या सुट्ट्या याच्यामुळे समुद्र, भरती, ओहोटी, लाटा, वाळू यांच्याशी कदाचित जन्म झाल्यापासूनच ओळख झाली होती. मालेगावला पाचवीत असताना बाबांची नाशिक जिल्ह्यातून थेट रायगड जिल्ह्यात बदली झाली […]
जीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..! […]
दुपारी बारा वाजल्यानंतर जहाजावरुन कंपनीला नून रिपोर्ट पाठवला जातो. मागील चोवीस तासात जहाजावर वापरलेले इंधन ,पाणी आणि जहाजाने कापलेले अंतर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती कंपनीला दिली जाते. दुपारी दोन वाजता चीफ इंजिनियर ने शिप्स ऑफिस मधून खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन केला. फ्रेश वॉटर टँक ची लेव्हल चेक करून रिपोर्ट करायला सांगितले. लेव्हल पाहिल्यानंतर त्याला […]
ज्युनियर इंजिनीयर असतांना एका दिवशी दुपारी जेवणानंतर मेन डेकवर मिडशीप क्रेनच्या सहाय्याने जहाजावरील चैन ब्लॉक आणि लिफ्टिंग इक्वीपमेंट टेस्टिंग साठी गेलो होतो. टेस्टिंग झाल्यांनातर पुन्हा इंजिन रूम जाऊन काम करण्याचा कंटाळा आला होता. मेन डेकवर बऱ्याच दिवसानंतर आलो होतो सकाळी उठल्यापासू केबिन मधून इंजिन रूम आणि इंजिन रूम मधून केबिन एवढंच, फक्त खाण्यापिण्याच्या वेळेत मेस रूम […]
फ्रान्सच्या बंदरात हेवी फ्युएल ऑईल लोड करून आम्ही जिब्राल्टरला आलो होतो. अर्धा कार्गो डिस्चार्ज करून जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीच्या पलीकडील किनाऱ्यावर स्युटा नावाचे बंदर आहे, उरलेला अर्धा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जहाज तिकडे निघाले आणि तासाभरातच तिथे पोचले. कार्गो डिस्चार्ज करून पुन्हा निघायला मध्यरात्र होणार होती. दुपारी माझा बारा वाजता वॉच संपल्यावर थर्ड मेट आणि मी जेवण करून […]