एका जहाजावर एक खलाशी ट्रेनी म्हणून पहिल्यांदाच आला होता. त्याने सोबत देवाची फोटो फ्रेम आणली होती. संध्याकाळी आंघोळ वगैरे आटोपल्यावर त्याने भक्तिभावाने देवपूजा करताना घरून आणलेली अगरबत्ती पेटवली आणि त्याला काही समजायच्या आत काही क्षणातच फायर अलार्म वाजला. टँव टँव करत कानठळ्या बसवणारा फायर अलार्म वाजला रे वाजला की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पहिला दिवस असल्याने […]
जहाजावर नोकरी करावी लागेल हे माहीत नसताना म्हणजे सुमारे 15 वर्षांपूर्वी आमच्या जुन्या घरात मोठा फिश टँक बसवला होता. आता दोन वर्षांपूर्वी नवीन घर बांधताना अजून मोठा फिश टँक घरात बसवून घेतला. फिश टँक मध्ये रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे सुंदर सुंदर मासे आणि त्यांची शांत व संथ हालचाल पाहून आपल्यालाच शांत शांत वाटू लागतं. फिश टँक […]
जेव्हा राष्ट्राध्यक्षांसारखी महत्त्वाची व्यक्ती काही बोलते तेव्हा त्यात गोपनियता पाळण्याची नितांत आवश्यकता असल्याची जाण चीन प्रशासनाला आहे. त्यामुळेच भारताने देऊ केलेली गाडी वापरण्यास नकार दर्शवत चीन च्या राष्ट्राध्यक्षांसाठी थेट चीनमधूनच गाडी मागवण्यात आली होती. म्हणजे राष्ट्रपतींकडे असलेली माहिती इतरांपासून लपवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू होते. […]
जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था दोन प्रमुख गोष्टींवर अवलंबून आहे. एक आहे पर्यटन आणि दुसरी आहे सफरचंद आणि इतर सुकामेवा. दहशतवाद्यांनी गेले काही दिवस सातत्याने सफरचंद उद्योगाला लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांचे सध्या लक्ष्य आहे तो काश्मीरचा सफरचंद उद्योग हे स्पष्ट आहे. […]
जहाजावरून घरी जायचं कन्फर्म झाले की साईन ऑफ पेपर वर्क सुरू होते. रीलिवर नसेल तर खूपच कमी वेळा विदाऊट रिलिवर साईन ऑफ केले जाते. साईन ऑफ म्हणजे प्रत्येक खलाशासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वात आनंदाचा योग असतो. जहाजावर प्रत्येक वेळी प्रत्येक जण पहिलं पाऊल टाकता क्षणी आपला साईन ऑफ होऊन घरी कधी जाऊ याचा विचार करायला सुरुवात करतो. […]
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद ४-७ ओक्टोबर भारत दौर्यावर होत्या. आपल्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची ही पहिलीच भारतभेट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने आपण सुवर्णअध्याय लिहू या, असे मोदी यांनी हसिना यांना बंगाली भाषेत सांगितले. […]
सुमारे आठ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदरात आमचे जहाज नांगर टाकून उभे होते. आम्ही कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी येऊन थांबलो होतो. जहाजाने किनाऱ्याजवळ नांगर टाकला होता. समोर एका छोट्याशा बेटावर एक टुमदार किल्ला दिसत होता. त्याच्यावर बहुधा फ्रान्सचा नौसेना किंवा सैनिक तळ असल्याचे दिसत होते. किल्ला अत्यंत मजबूत आणि सुस्थितीत होता तसेच त्याच्यावर चारही बाजूला तोफा दिसत […]
सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होतं. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि […]
बाबा पोलीस खात्यामध्ये थेट फौजदार म्हणून भर्ती झाले होते त्यामुळे त्यांची खाकी वर्दी आणि खांद्यावर असणारे दोन चांदीचे स्टार बघत बघत मोठे होत होतो. सहावित असतानाच बाबांचं प्रमोशन झाल्याने आणखीन एक तिसरा स्टार वाढला. पी एस आय चे इन्स्पेक्टर झाले आणि रिटायर होता होता ए सी पी झाले. त्यांच्या खाकी वर्दीला असणारा रुबाब आणि त्याहीपेक्षा असणारा […]
बंगालच्या उपसागरात एक मासेमारी करणारी भारतीय बोट पाण्यात बुडाली. त्या बोटीवर 15 सहकाऱ्यांसह असणारा एक भारतीय खलाशी रबिंद्र दास सुमारे पाच दिवस कशाच्या तरी आधारावर तरंगत राहिला पण 600 km खोल समुद्रात प्रवाहा सह वाहून गेला. समुद्रात पाच दिवस अन्न आणि पाण्याशिवाय तेही वादळी हवामानात तो जिवंत राहिला होता. हवामान खराब त्यात जी बोट बुडाली होती […]