तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू. […]
जर कसाबवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर मग या पुलाच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिका, राज्य शासन आणि रेल्वे प्रशासनातील संबंधीत अधिकारी व या विभागाचे नगरसेवक, आमदार व खासदार यांच्यावर देशातील निरपराध नागरीकांच्यी जिविताविरुद्ध संगनमताने कट रचल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये? देशाच्या नागरीकांविरुद्धचा कटाचा गुन्हा, देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखाच मानला जावा. […]
शबरीमालाच कशाला, आपल्या प्रत्येक रूढी-प्रथा-परंपरा या का आणि कधी अस्तित्वात आल्या, त्या त्याकाळची समाज व्यवस्था, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातील किती परंपरा आता सुरु ठेवायला हव्यात आणि कालानुरूप त्यात बदल करावेत की नाही ह्याची कल्पना अभ्यासांती प्रत्येकाला येऊ शकेल. हा अभ्यास केवळ हिन्दूंनीच करावा असं माझं म्हणणं नाही. आपल्या देशातील सर्वच धर्म-पंथाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे. […]
बोरघाट बांधणीचे हे अवघड बांधकाम ब्रिटिशांनी कर्जत, पळसदरी ते खंडाळा आणि लोणवली (लोणावळा) ते खंडाळा असे दोन्ही बाजूंनी सुरू केले होते. हा घाट बांधण्याचा खर्च दर मैला मागे ६,६४,३७५ रुपये इतका, तर एकूण खर्च १,०५,००,२६७ रुपये इतका झाला. एका रुपया मध्ये ३५ ते ४० किलो तांदूळ मिळण्याचा आणि कारकुनाचा पगार आठ ते दहा रुपये आणि अधिकाऱ्यांचा पगार वीस ते पंचवीस रुपये महिना असण्याच्या त्या काळात हे खर्चाचे आकडे छाती दडपून टाकणारे होते. […]
चिनी उत्पादनांवर बंदी घालून त्यांची आर्थिक कोंडी केली पाहिजे. फक्त इलेक्ट्रॉनिक्स नाही, तर खाण्या-पिण्यापासून ते आमच्या देवधर्मापर्यंत प्रत्येक गोष्टीत चीन घुसला आहे. या चीनचे हे मार्केट बंद करून, चिनी मालावर बंदी घालून चीनचे नाक कापून काढण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षात आम्ही इतके चीनमय झालो आहोत की घरात आमच्या फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्राची घुसखोरी झाली. चिनी देव आमच्या घरात घुसले. लाफिंग बुद्धा, तीन पायांचा बेडूक, कासव, घंटा आणि बरेच काही. […]
१८४३ साल उजाडलं. जगातली पहिली रेल्वे धावली त्याला अठरा वर्ष झाली होती. एव्हाना ब्रिटिश सरकारच्या गाठीशी युरोपियन रेल्वे बांधणीचा बराच अनुभव जमा झाला होता. तो अनुभव हाताशी घेऊन १८४३ मध्ये भारतीय रेल्वेच्या बांधणीच्या दृष्टीने प्रत्यक्ष हालचाली सुरु झाल्या. जॉर्ज क्लार्क या ब्रिटिश इंजिनीअरने मुंबईजवळील भांडूप या खेड्यात काही प्रतिष्ठित व्यक्तींची सभा घेतली आणि त्या सभेत रेल्वेची स्थापना केली. […]
देशभक्त नागरीक म्हणून आज सर्वांनी स्वतःवर सेल्फ सेन्सरशिप लादून आपण एक जबाबदार भारतीय म्हणून कार्य करण्याची अपेक्षा आहे. आज बदलत्या काळात अपप्रचार हीदेखील एक युद्धनीती झालेली आहे. त्यामुळेच या माहितीयुद्धामध्ये अत्यंत सजगतेने वर्तन करण्याची अपेक्षा प्रत्येक भारतीयाकडून आहे. ही वेळ जबाबदार नागरिकांची एकजूट दाखवण्याची आहे. […]
इ.स. १८०० ते १८२० यादरम्यान इंग्लंड या देशात रेल्वेमार्ग बांधण्याचे आराखडे आखले जात होते. प्रयत्नांना आकार येत गेले आणि १८२५ साली ३८ डब्यांची जगातली पहिली वाफेच्या इंजिनाची प्रवासी रेलगाडी इंग्लंडमध्ये स्टॉकटोन ते डार्लिंग्टन मार्गावर धावली. वाफेच्या इंजिनाचे जनक जॉर्ज स्टीफन्सन यांनी या गाडीचं उद्घाटन केलं. एका नव्या वेगवान युगाचा तो प्रारंभ होता, पण प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये मात्र रेल्वेच्या विरोधात मोठा गहजब माजला. […]
सकाळचा अभ्यास करुन आम्ही दोघे रोज धावण्यासाठी व व्यायामासाठी बाहेर पडत असू. साधारण दोन एक मैल आम्ही धावत व्यायाम करावयाचा. रस्त्याने वा शाळेच्या मैदानावर चकरा मारायचे. एक गोष्ट गमतीची घडत असे. अचानक आठवली. शाळेच्या शेजारील शेतामध्ये, प्रासंगीक छोटी छोटी पिके लावली जात होती. त्यांत भुईमुगाच्या शेंगा, चवळी, टहाळ ( हरबरा ), मका, असायचे. ही पिके येऊ […]