मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं ?
हा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासहीत इतरांनाही त्रास देऊ नये ही विनंती. […]
नियमितपणे प्रसिद्ध होणार्या मजकूरासाठी खास सदरे
हा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासहीत इतरांनाही त्रास देऊ नये ही विनंती. […]
डिसेंबर मधील राजस्थानातील गारठवणारी रात्र. अवकाशात फक्त चांदण्यांचा प्रकाश, दूर कुठेतरी, कुणीतरी शेकोटी पेटवलेली दिसते परंतु आसमंत सगळाच काळा/निळा. कुठेच कसल्याच हालचालीची जाणीव नाही की आवाज देखील नाही. वाऱ्याने देखील आपले अस्तित्व लपवून ठेवलेले!! एखाद्या निर्वात पोकळीत फक्त स्वत:चेच अस्तित्व असावे, तरीही आजूबाजूला पसरलेल्या मूक वाळूची तितकीच मूक साथ. अशा वेळी वाळवंट देखील आपल्याशी संवाद साधू […]
“भरुनी राहिलीस तूच माझिया नेत्रांमधुनी निद्रेमधुनि, स्वप्नामधुनी, जागृतीतुनी कळले आता असून डोळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन” कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका अप्रतिम प्रणयी कवितेतील काही ओळी. अर्धोन्मिलित अवस्थेत असताना, निद्रीस्तावस्थेत जाणवणाऱ्या मुग्ध प्रणयाची सुंदर छटा आपल्याला या ओळींतून प्रतीत होते. आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी […]
“तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे “. ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा “स्वभाव” मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम […]
२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था आणि क्षमता याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. सागरी सुरक्षेचा इतिहास हे अगदी स्पष्टपणे दाखवतो की, आपण केवळ संकटकाळात जागे होतो. सगळ्यांनीच इतिहासाचा नियमितपणे अभ्यास करावा ज्यामुळे दुर्देवी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही. […]
इकॉनॉमिक इंजिन’ म्हणून सागरी किनारपट्टीचा वापर होतोय. भारताला लाभलेल्या किनारपट्टीवरील बंदरांचे आधुनिकीकरण (मॉडर्नायझेशन ऑफ पोर्टस) करून तेथे ‘इंडस्ट्रीअल क्लस्टर्स’ सागरमाला प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहेत. ग्लोबल शिपिंगच्या दृष्टीने बंदरांच्या विकासाद्वारे एक कोटी रोजगार उपलब्ध होणार आहेत. जलवाहतुकीद्वारे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होईल.रेल्वेने वाहतुकीचा खर्च सव्वा रुपया, रस्त्याद्वारे एक रुपया, तर जलवाहतुकीद्वारे पंचवीस पैसे एवढा फरक आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही जलवाहतूक उपयुक्त आहे. […]
“गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावें बुडतां बुडतां सांजप्रवाही; अलगद भरून यावे.” कवी ग्रेसच्या या अजरामर कवितेच्या ओळी वाचताना, मला नेहमी पुरिया धनाश्री रागाची आठवण येते. तसाच तो संधिप्रकाश, अंधार येत असतो पण प्रकाशाचे अस्तित्व जाणवत असतो. मनात कुठली एखादी आर्त आठवण दाटून येते आणि गळ्यात आवंढा अडकतो. आपल्याला फार एकटे, एकटे वाटत असते आणि त्या […]
रात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात. रागाची मांडणी बघायला गेल्यास, आरोहात पाच स्वर तर […]
सर्वसामान्य माणसाचे आयुष्य तसे सरळसोट असते, खालच्या मानेने आयुष्य व्यतीत करण्याकडे त्याचा अधिककरून कल असतो. शक्यतो विना दैन्य, विना रोष, आणि शक्यतो इतरांशी जमवून घेण्याचा स्वभाव असतो. त्या आयुष्यात येणारी सुख-दु:खे देखील आत्ममश्गुल स्वरुपाची असतात आणि त्याची झळ किंवा प्रसंगोत्पात येणारे आनंदाचे प्रसंग देखील त्याच मर्यादेत बंदिस्त असतात. केदार रागाचा विचार करताना, हेच सूत्र माझ्या मनात […]
ती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती. त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक दरवाजा होता. तो ही पांढरा फटक! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions