नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

वैभवशाली, शांत, निरव…दरबारी

“इश्क मुझ को नहीं वहशत ही सही मेरी वहशत तेरी शोहरत ही सही हम भी दुश्मन तो नहीं हैं अपने गैर को तुझ से मोहब्बत ही सही” मिर्झा गालिब यांच्या एका सुप्रसिद्ध गझलेतील या ओळी म्हटले तर दरबारी रागाची तोंडओळख दाखवतात अन्यथा एका प्रेमी मनाची हैराणी अवस्था दर्शवतात. दरबारी राग हा असाच आहे, एकाच वेळी मानवी भावनांच्या […]

माझा चड्डी यार – भाग २

आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई. […]

अंतर्मुख शिवरंजनी

क्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, फिकट राखाडी रंग दिसावा आणि मनात कुठल्यातरी आर्त, हळव्या आठवणींच्या सुट्या आठवणी याव्यात, त्याप्रमाणे शिवरंजनी रागाचे स्वरूप मला वाटते. खरतर याचा पाच स्वरांचा कारभार. भूप रागातील शुध्द गंधार, कोमल केला की लगेच शिवरंजनी राग मिळतो. गमतीचा भाग म्हणजे याही रागात, “मध्यम” […]

ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८

२६ नोव्हेंबर २००८ ला  मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात आले. नॅशनल सिक्युरिटी गार्ड  (एनएसजी) दिल्लीवरून विमानाने ११६३ किलोमीटरचे अंतर पार करून २७ नोव्हेंबर २००८ ला सकाळी तीन वाजता’ मुंबईत पोहचले. एनएसजीच्या ऑपरेशनमध्ये एकूण आठ दहशतवादी मारले गेले. एनएसजीचे दोन कमांडो ठार झाले तर १८ जण जखमी झाले. […]

पाकिस्तानला इशारा देणारा तडाखा

पाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला तरी हा हल्ला महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला आक्रमक कारवाईनेच उत्तर देणे गरजेचे असले तरी भारताने अन्य मार्गांचा अवलंब करून पाकिस्तानची कोंडी केली पाहिजे. […]

माझा चड्डी यार – भाग १

आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते,  तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात. […]

आश्वासक जयजयवंती

मुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात […]

अफलातून योजना

रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी  गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच  आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो,  विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती.  लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. […]

पाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता

26-11 चा मुंबई दहशतवादी हल्ला हा समुद्राकडूनच झाला होता. या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण होतील. पुन्हा एकदा भारताला धडा शिकवण्याच्या हेतूने पाकिस्तान हल्ल्याचे नियोजन करीत आहे. 26-11 चा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली असतानाही तो थांबवता आला नाही. त्यामुळेच या लेखामध्ये सागरी सुरक्षा अधिक बळकट कशी करता येईल याविषयी चर्चा करूया. […]

1 56 57 58 59 60 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..