कोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. […]
खरतर संगीतात अनेक भावना आढळतात पण त्या भावनांचा शास्त्राशी संबंध जोडला तर हाताशी तसे फारसे लागत नाही. काहीवेळा असेच वाटते, केवळ काही स्वरांच्या साद्धर्म्याने विचार केला तर, काही भावना मनाशी येऊ शकतात तरीही, अखेर शास्त्रकाट्यावर तपासणी करता, सूर आणि भावना, याचे नेमके नाते जोडता येत नाही, हेच खरे. मग प्रश्न पडतो, राग आणि समय, किंवा राग […]
माडीवर सारंगीचे सूर जुळत, तबलजी तबल्यावर हात साफ करायच्या प्रयत्नात आहे, खोलीतील दिवे हळूहळू मंद होत आहेत, आलेले रसिक मनगटावरील गजऱ्याचा सुगंध घेत आणि तोंडातील तांबुल सेवनाचा आनंद घेत आहेत. बाजूलाच पडलेला हुक्का आपल्याजवळ ओढून, एखादा रसिक, त्यातील सुगंधी तंबाकूचा स्वाद घेण्यात मश्गुल झाला आहे. तसे बघितले तर संध्याकाळ कधीचीच उलटलेली आहे परंतु नेहमीच्या मैफिलीतील मानिंद […]
काळीभोर मखमली मध्यरात्र पुढ्यात असावी, वातावरणात गोड शिरशिरी अंगावर उठवणारी थंडी असावी, समुद्राच्या पाण्यावर चंदेरी लहरी हेलकावे घेत असाव्यात आणि हातात असलेल्या ग्लासातील मद्यात चंद्र किरण शिरून, त्या मद्याची लज्जत अधिक मदिर व्हावी!! दूर अंतरावर क्षितिजाच्या परिघात कुठेच कसलीही हालचाल नसावी आणि त्यामुळे शांतता अबाधित असावी!! समुद्राच्या लाटा देखील, नेहमीचा खळखळ न करता, आत्ममग्न असल्याप्रमाणे वहात […]
“तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत; वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो – तसा खालती गेला. हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान; ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा “जोगिया रंगे.” माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, ‘जोगिया” रागाची […]
असेच काही द्यावे…. घ्यावे…. दिला एकदा ताजा मरवा; देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा. कवियत्री इंदिरा संत यांच्या “मरवा” कवितेतील या ओळी, “अडाणा” राग ऐकताना, बरेचवेळा माझ्या मनात येतात. वास्तविक पाहता, दरबारी रागाच्या कुटुंबातील, हा महत्वाचा सदस्य पण जातकुळी मात्र फार वेगळी आहे. एकाच कुटुंबातील भिन्न […]
या लेखात आपण आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने साधारणपणे कोणत्या रंग संवादाचे आणि रंग आकार यांचे पेंटिंग आपल्या नजरेसमोर ठेवावे यावर विचार करू. […]
आपल्या रागदारी संगीताचा जेंव्हा साकल्याने विचार करायला लागतो, तेंव्हा प्रत्येकवेळी मला कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि आपला विचार किती “थिटा” आहे, याची नव्याने जाणीव होते. “मुक्तायन” काव्यसंग्रहात, “मी” या कवितेतील काही ओळी या वाक्यावर थोडा प्रकाश पाडू शकतील, असे वाटते. त्या ओळीत मी थोडा बदल केला आहे!! “माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केव्हढातरी […]
रेल्वेच्या संबंधातील विषयांची व्याप्ती फारच मोठी आहे. इतिहास, रेल्वे बांधणी, विविध मार्ग, गाड्या, प्लॅटफॉर्मस, वेटिंग रुम्स, स्टेशनांच्या इमारती, तांत्रिक माहिती…. खरंतर या जंत्रीला शेवटच नाही, या सर्वांमधून मिळणारी माहिती शोभादर्शकातून म्हणजेच `कॅलिडोस्कोप’ मधून दिसणाऱ्या रंगीत काचेच्या तुकड्यांच्या क्षणचित्रांसारखी रंजक आहे. […]
या लेखामध्ये एचएएलने विमाने कशी निर्मिती केली, यांनी बनवलेल्या विमानांची क्षमता कशी होती, या विमानांची किंमत किती होती आणि ही विमाने वेळेवर हवाई दलाला देण्यात आली होती का, त्यांच्याऐवजी खाजगी क्षेत्रातील कंपनीला प्राधान्य का देण्यात आले या पैलूंवर ते आपण चर्चा करू. […]