रस्त्यासमोरील प्रचंड डोंगर चढताना, अंगावर पाउस झेलत आणि डोळ्यासमोरील धुकाळ वाटेत आपली वाट चाचपडत आणि शोधत, डोंगरमाथा खुणावत असतो. हळूहळू आजूबाजूच्या झाडांचा सहवास कमी होत जातो आणि वातावरण अत्यंत निरव, प्रशांत होत जाते. अखेरच्या टप्प्यात तर साधी झुडुपे देखील आढळत नाहीत आणि तरीही अनामिक ओढीने आपण, अखेर डोंगरमाथ्यावर येउन पोहोचतो आणि खाली नजर टाकतो!! खालचा विस्तीर्ण […]
आपल्या भारतीय संगीतात, रागांच्या प्रकृतीनुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्याला “थाट” असे म्हणतात, जसे, “मारवा थाट”,”कल्याण थाट” इत्यादी. त्यानुसार, हा राग “कल्याण” थाटात येतो तसेच गमतीचा भाग म्हणजे. आपले उत्तर भारतीय संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत, यात बरीच देवाणघेवाण चालू असते. दक्षिणात्य संगीतात, याच रागाशी मिळता जुळता असा “कल्याणी” नावाचा राग ऐकायला मिळतो. अर्थात, स्वर […]
चालायला सुरवात करताना, साथीला ३ ४ झाडांची साथ असताना, हळूहळू, नजरेसमोर हिरव्या गर्द वृक्षांची दाटी होऊन, त्यातच आपले मन गुंतून जावे त्याप्रमाणे यमन रागाचे काहीसे वर्णन करता येईल. तसे बघितले तर, सगळ्याच रागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात असलाच अनुभव येतो म्हणा. यमन राग हा बहुदा एकमेव राग असावा, ज्या रागाची सुरवात “सा” स्वराने न होता, “नि” स्वराने होते म्हणजे “नि” […]
विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का? इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का? रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले. याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात, त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं, याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल. […]
मागील लेखात आपण अश्विनी नक्षत्राचा त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती वर काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घेतले. या लेखात आपण पूर्वाषाढा या नक्षत्राबद्दल माहिती घेऊन या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, कोणते रंग या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात, कोणत्या व्यक्तीने वर्ज्य करावयास हवेत म्हणजे टाळायला हवेत वगैरे माहिती जाणून घेऊ. नक्षत्र मालिकेतील […]
२०११ च्या फेब्रुवारीतील शेवटचा आठवडा होता. दक्षिण आफ्रिकेतील उन्हाळा चालू होता. वास्तविक या देशात एव्हाना १७ वर्षे काढली होती तरी या वर्षीचा उन्हाळा थोडा कडकच होता. माझ्या हेड ऑफिसमधून – बोटस्वाना मधून दोन कर्मचारी कंपनीच्या कामासाठी आठवडाभर आले होते, त्यामुळे काम संपवणे फारच जिकिरीचे झाले होते. ऑफिसमध्ये एयर कंडिशन असला तरी बाहेर उन्हाच्या झळा जाणवायच्या. इथे […]
प्रत्येक झाडाचे प्रत्येक पक्षी कसले तरी कसले तरी गाणें गातो प्रत्येक सूर पानाइतकाच झाडांनाही आपला आपला वाटतो गाणें गातात देणें देतात झडून जातात उडून जातात झाडे नुस्ती नुस्ती नुस्ती रहातात आरतीप्रभूंची ही अजरामर कविता. छंदात्मक रचनेपासून वेगळे अस्तित्व दाखवणारी आणि तरीही आशयाचा अप्रतिम नमुना दाखवणारी. केवळ शब्दांच्या उलटापालटी मधून, वेगवेगळे आशय व्यक्त करणारी. या कवितेत, गाणें […]
रोहिंग्यांच्या परतपाठवणीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, तीही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यातून या ‘डिपोर्टेशन’च्या निर्णयावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाले आहे. हा निर्णय भारताच्या राष्ट्रीय संरक्षणाच्या हिताच्या दृष्टीने घेतला गेलेला आहे. […]
नेपाळला चीनच्या बंदरांतून व्यापार करणे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक ठरणार आहे. ही बाब लक्षात आणून देऊन भारताने नेपाळशी भारताच्या बंदरांतून व्यापार करण्याकरता व्यापार करार करणे गरजेचे आहे. […]