किती साधे तिचे बोल होते. अगदी सहज ती ते व्यक्त करीत होती. त्या छोट्या मुलीजवळ केवळ प्रासंगिक अनुभवलेल्या घटनांची शिदोरी होती. ती ते मज जवळ उघडे करीत होती. आपण काय व्यक्त करतो ह्याची कदाचीत तिला कल्पनाही नसेल. परंतु जीवनाचे एक प्रचंड तत्त्वज्ञान ती माझ्यावर, एक आजोबा झालेल्या वयावर फेकीत होती. […]
“अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मींची द्यावी सांग; कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग!!” मर्ढेकरांच्या या अजरामर ओळींतून जोग रागाची पुसटशी ओळख मिळते. खरतर शब्द आणि सूर यांची नेमकी सांगड घालणे ते फार अवघड असते. त्यातून कविता हे माध्यम एका बाजूने शब्दमाध्यमातील सर्वाधिक लवचिक माध्यम आणि सूर तर नेहमीच अर्धुकलेली भावना […]
साउथ आफ्रिका हा तसा 1st दर्जाचा देश मानला जातो. त्यामुळे, इथल्या सुविधा ह्या बहुतांशी उत्तम दर्जाच्या किंवा त्याच्या आसपास असतात. आता तुलना करायची झाल्यास, कमतरता नक्कीच आहे, जसे रविवार संध्याकाळी बाहेर जेवायला जायचे म्हणजे कर्मकठीण!! त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते!! मुंबईत रात्री-बेरात्री बाहेर रस्त्यावर पायी हिंडायला काहीच वाटत नाही पण, साउथ आफ्रिकेत […]
संध्याकाळ उलटत असताना, रात्रीचे रंग आकाशात पसरत असताना, कानावर “रसिक बलमा” ही काळीज चिरून टाकणारे शब्द येतात आणि डोळ्यातील उरलेली झोप पूर्णपणे उडून जाते!! गाण्याचा पहिल्याच आलापित अवघे स्वरशिल्प उभे करणारा तो अविस्मरणीय आवाज, पहिल्याच झटक्यात आपल्या मनात रुतून बसतो. “रसिक बालमा हाये, दिल क्युं लगाया, तोसे दिल क्युं लगाया” या ओळीतील पहिल्या “लगाया” वर जी भावनांची थरथर […]
चीनमधील ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर भारताने हक्क सांगणे गरजेचे आहे आणि त्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय मदत घेण्यासही हरकत नाही. भविष्यातील पाणीसंकटावर लक्ष ठेवून ब्रह्मपुत्रेचे पाणी भारताशी वाटून घेण्यास चीनला भाग पाडले पाहिजे. […]
देशभक्ती म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. […]
प्रिटोरिया मधील जूनमधील रविवार सकाळ!! आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम!! इथे रविवारी ११ नंतर साउथ आफ्रिकेला “जाग” येते. शनिवार संध्याकाळ/रात्र बहुदा पार्टीत घालवायची, हा जणू नियम असल्यागत सगळे […]
भारतीय रागसंगीतात असे बरेच राग सापडतात, जे “ख्याल” म्हणून अधिक प्रचलित न होता, उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात बरेच लोकप्रिय असतात. पूर्वी आपण, असे काही राग बघितले आहेत, जसे पिलू या रागाचे असेच नाव अग्रभागी येते. याचे मुख्य कारण, बहुदा या रागाचा उगम लोकसंगीतातून झाला असावा. याबाबत असे देखील विधान करता येईल, “ख्याल” म्हणून या रागात “भरणा” […]