देव आहे म्हणणारे अनेकजण आहेत तसेच देव ह्या संकल्पनेचे अस्तित्व पूर्णपणे नाकारणारे देखील अनेक आहेत. प्रत्येकजण आपल्या तर्क बुद्धीने देव ह्या संकल्पनेस मान्यता देतो. अथवा अमान्य करतो. ह्याचे प्रमुख कारण त्या अनंत, अविनाशी, विशाल, सर्व व्यापी शक्तीला खऱ्या अर्थाने कुणीच पाहिले नाही, समजले नाही, जाणले नाही. […]
एखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली!!) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज). अर्थात, माझ्यासारखे नोकरीसाठी येउन स्थायिक झालेले तसे बरेच आहेत पण […]
वास्तविक या गावात मी केवळ २ वर्षेच राहिलो पण, तरीही साउथ आफ्रिकेचा “अर्क” बघता आला!! मुळात, Standerton हे छोटेसे गाव, जिथे मनोरंजनाची साधने जवळपास अजिबात नाहीत, थंडीच्या मोसमात हाडे गोठवणारी थंडी, आमची कंपनी आणि नेसले कंपनीचा कारखाना ( ३ वर्षांनी हा कारखाना देखील दुसरीकडे हलवला!!) वगळता कुठलीच मोठी इंडस्ट्री नसल्याने, रोजगाराच्या संधी तशा फारच कमी. खरतर, आमची बृवरी […]
मंगेश पाडगांवकरांच्या एका कवितेत, “निकट असूनही श्वासापुरते दूर असावे जवळपणातही पंखांना आकाश दिसावे हवे वेगळेपण काहीतरी मीलनातही सखी अपुल्यातून इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन”. आत्ममग्न तळ्याकाठी आत्मरत व्हावे, तसे होत असताना मिलनाची जाणीव संदिग्ध मनाच्या आंतरिक ओढीतून व्यक्त व्हावी, साथीला काठावरील वृक्षांच्या सळसळीची मंद साथ असावी आणि पाण्याच्या संथ लाटांमधून “कोमल गंधार” प्रतीत […]
श्रद्धेचा जन्मच ज्ञानातून होतो. जस जसे ज्ञान प्राप्त होऊ लागते, समज येऊ लागते, जाणीव होऊ लागते, माणसाच्या विचारांना तशा “ विश्वासाच्या चौकटी ” निर्माण होऊ लागतात. चौकटीचे निर्माण केलेले अस्तित्व म्हणजेच श्रद्धा होय. […]
जसजसा मी कामात रुळायला लागलो तशी, विशेषत: गोऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवायला जमू लागले. एक गोष्ट इथे मी स्पष्ट नक्की करतो. माझ्या बरोबरचे किंवा माझे वरिष्ठ जेंव्हा, तेंव्हा केंव्हा काम करीत त्यावेळेस, फक्त काम. अगदी प्रियकर/प्रेयसीचा फोन आला तरी जेव्हढ्यास तेव्हढे!! अर्थात, संध्याकाळचे ५.०० वाजले की ऑफिसच्या बाहेर!! इथे एकतर ऑफिस सकाळी ८.०० वाजता सुरु होते, त्यामुळे सगळेच, सकाळी लवकर […]
वातावरणात उन्हाच्या प्रचंड झळा लागून, मनाची तलखी होत असावी. थंड पाणी पिऊन देखील घशाला शोष पडावी. घराबाहेर नावाला देखील वाऱ्याची झुळूक नसावी आणि त्यामुळे झाडांची पाने देखील शुष्क आणि अम्लान झाली असावीत. सगळीकडे रखरखाटाचे वातावरण पसरले असावे. डोक्यावरील पंख्यातून देखील गरम हवेचे(च) झोत पडत असावे आणि त्यामुळे चिडचीड वाढत असावी. बाहेर नजर ठरत नसावी कारण, डोळ्यांना उन्हाची […]
२००५ मध्ये, मी रस्टनबर्ग (इथेच जगप्रसिध्द “सन सिटी” आहे!!) इथे नोकरी करताना, ध्यानीमनी नसताना, Standerton इथे नोकरी करायची संधी मिळाली. त्यातून, भारतातील प्रसिद्ध United Breweries या ग्रुपच्या इथल्या कारखान्यात फायनान्स विभागाचा प्रमुख म्हणून वरिष्ठ अधिकारी अशी म्हणून नेमणूक झाली. त्यामुळे, अर्थातच आनंद झाला. त्याचबरोबर इतक्या वर्षात संपूर्णपणे एकट्याने राहावे लागणार, हि जाणीव झाली. वास्तविक, या देशात मी १९९४ […]
“सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती; मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती.” कविश्रेष्ठ मर्ढेकरांच्या या ओळींतून निसर्गवर्णन नेमक्या रीतीने आपल्याला वाचायला मिळते. विशेषत: “मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती” ही ओळ तर खास “बहार” रागाचीच आठवण करून देते. बहार रागाची जाती “औडव/षाडव” आहे, म्हणजे आरोहात ५ स्वर तर अवरोहात ६ स्वर येतात. आरोही […]
साउथ आफ्रिकेत मी एकूण १७ वर्षे राहिलो, अनेक लोकांशी ओळखी झाल्या, काही मोडल्या तरीही माझा प्रिटोरियामधील काळ हा सर्वोत्तम,असेच म्हणायला हवे. एकतर राहायला सुंदर घर मिळाले होते, बरेचसे भारतीय (माझ्यासारखे नोकरीसाठी आलेले) आजूबाजूला राहात होते, त्यामुळे गाठीभेटी (जरी नैमित्तिक असल्या तरी!!) होत असत. इथेच, मी पहिल्यांदा सिम्फनी संगीताची मैफिल प्रत्यक्ष ऐकली आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत घरी […]