येत्या २०१८ – २०१९ मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे शक्य नाही. […]
UB group मधील नोकरीचे “बारा” वाजायला लागल्यावर, नवी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. वास्तविक, या नोकरीत स्थिरस्थावर व्हायची इच्छा होती पण प्रारब्ध वेगळेच होते. Standerton हे गाव, म्हणावे अशा अटकर बांध्याचे आहे. आजूबाजूला कुठलेच शहर नजरेच्या टप्प्यात नाही. जुन, जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी असल्याने, लोकवस्ती तशी विरळ!! सुदैवाने, माझ्याच ओळखीत, जोहान्सबर्ग इथे एका कंपनीत, नोकरी संदर्भात […]
भारतीय रागसंगीतात एकूणच, बहुतेक सगळे राग हे, धार्मिक, भक्तीभाव समर्पण, प्रणयी किंवा दु:खी असेच भाव दर्शविणारे आहेत. अर्थात ह्या भावना, आपल्या संस्कृतीचा स्थायीभाव असल्याने, या भावनांचे प्रतिबिंब, कलेवर पडणे साहजिक आहे. या समजाला छेद देणारे काही राग आहेत, त्यात हंसध्वनी रागाचा समावेश होतो. एकूणच या रागाची ठेवण, आनंदी, उत्फुल्ल अशी आहे. खरेतर हा राग, कर्नाटकी संगीतातून […]
साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही. इथली हवामानाची एक फार सुंदर मजा आहे. समजा, सतत २ ते ३ दिवस कडक(इथल्या मानाने!!) उन पडले की […]
डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा “पहाडी” रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. […]
एकनाथराव यांची मला गम्मत वाटते. त्यांची विचारसरणी सतत काहीं तरी क्रियात्मक घटनामध्ये व्यस्त असते. अतिशय छोट्या गोष्टी. मात्र खोलांत शिरलो तर त्यातून एखादे महान तत्वज्ञान कळू लागते. हे किती क्षुल्लक, मला हे कां सुचले नाही. ह्याची खंत मनांत येते. […]
आपल्याला राशी – नक्षत्र वगैरे दिसत नाहीत मात्र रंग दिसतात. जी गोष्ट आपल्याला दिसते तीचं ज्ञान घ्यायला नव्हे व्हायला वेळ लागत नाही. ज्या बाबींचे ज्ञान होतं – आकलन होतं – त्यावर आपला चटकन विश्वास बसतो. विश्वास बसला तर उचित परिणाम व्हायला आपले मन आणि शरीर साथ देत असतं. आणि अद्भुतता वाटणारी ही ‘रंग चिकित्सा’ आपल्याशी कधी ऋणानुबंध प्रस्थापित करते हे कळत देखील नाही. […]
इथले समाज जीवन, हे प्रामुख्याने, मॉल आणि मॉल संकृतीशी जखडलेले आहे. अर्थात, हे मॉल्स मात्र असतात अतिशय सुंदर, प्रशस्त नि विविध गोष्टीनी सामावलेले!! अशा मॉल्स मध्ये, माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजा, पुरवणारे दुकानदार असतात. इथे, नुसते जोहानसबर्ग जरी लक्ष्यात घेतले तरी, या शहरातील प्रत्येक उपनगरात, फार प्रशस्त मॉल्स आहेत. अगदी, नावेच घ्यायची झाल्यास, Sandton, Fourways, Bedfordview, Eastgate, […]
“दंवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा; अवचित गेलीस पेरीत अपुल्या तरल पावलांमधील शोभा” कवी मर्ढेकरांची अतिशय सुंदर मुग्ध प्रणय दर्शविणारी ही कविता. यातील, तरुणीचे, थंडगार हवेत, भल्या सकाळी येणे आणि जाताना, आपला अननुभूत ठसा उमटविणे, सगळेच अप्रतिम. राग ललत हा याच प्रकृतीचा आहे. प्रसन्न, प्रणयी तरीही संयत आणि मुग्ध आणि नवथर हुरहुरीची थरथर दर्शविणारी. अगदी […]
12 ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअर येथे खलिस्तानवाद्यांच्या एकत्र येण्याला भारताने कडाडून विरोध केला होता.भारताने हा प्रस्तावित मोर्चा होऊ नये अशी मागणीही इंग्लंडकडे केली होती. मात्र इंग्लडने तसे करण्यास नकार दिला. यावर भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली .हा मोर्चा म्हणजे भारताच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका पोहोचेल, असे फुटिरतावाद्यांनी केलेले कृत्य आहे अशा शब्दंमध्ये भारताने म्हटले आहे. […]