नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

हिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. […]

साउथ आफ्रिका – भाग ६

जसे मी मागील लेखामध्ये  व्हाईट समाजाविषयी चांगल आणि वाईट, अशा दोन्ही गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. तसाच प्रकार भारतीय वंशीय लोकांच्या बाबतीत लिहिला. अर्थात असे नव्हे की, या सामाजात अनेक वाईट गोष्टी आहेत. त्याचे थोडक्यात असे आहे की, इथला भारतीय समाज सतत वर्षानुवर्षे एका प्रचंड मानसिक कुचंबणेखाली वावरत असल्याने, त्यांची अशी अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया घडत असते. मी […]

शृंगारिक तिलक कामोद

कुठलीही कला, ही किती “अमूर्त” स्वरूपात असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलेचे शास्त्र अवगत करून घेणे अत्यावश्यक ठरते. संगीत आणि रागदारी संगीत याबाबतीत हा विचार फारच आवश्यक ठरतो. पूर्वीच्या काही संस्कृत ग्रंथात, स्वरांबद्दलची बरीच वर्णने वाचायला मिळतात आणि त्यानुसार, स्वरांचे रंग, देवता इत्यादी बाबी वाचायला मिळतात परंतु या वर्णनांना तसा “शास्त्राधार” सापडत नाही. […]

असेही एक स्वच्छता अभियान

एकनाथरावांचे कार्य अत्यंत छोटे वाटत असले तरी प्रचंड असे वाटते. उत्पन्न झालेल्या भावनांना कांहीजण विचारांच्या चक्रांत स्वतःच्या मनाला वाटेल तसे करु इच्छीतात. […]

साउथ आफ्रिका – भाग ५

कालपर्यंत, मी व्हाईट लोकांच्या एका विशिष्ट राहणीबद्दल लिहिले. वास्तविक सगळे गोरे काही श्रीमंत नसतात. मी तर किती तरी गोरे लोक, रस्त्यावर भीक मांगताना पहिले आहेत. एक गोष्ट मात्र विशेषत्वाने लिहायची व ती म्हणजे, त्यांच्या रक्तातच गुण आहे की त्यांचे वेगळे रसायन आहे, ते कळणे अवघड आहे, पण एकूणच बहुतेक सर्व गोरे फार अभिमानी आणि गर्व राखणारे […]

वैभवशाली भूप

मराठीत एकूणच बहुतेक सगळ्या भूपाळ्या या भूप रागाच्या सावलीत तरी आहेत किंवा रागावर आधारित आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे सकाळच्या वेळेचा शुचिर्भूत भाव आणि प्रसन्न मनोवस्था, यांचा भूपालीच्या रचनेत अंतर्भाव होत असल्याने, चालीसाठी भूप राग जवळचा वाटणे साहजिक आहे. […]

साउथ आफ्रिका-भाग ४

एकूणच इथला भारतीय समाज, हा गतानुगतिकतेत अडकलेला आहे. प्रचंड अंधानुकरण आणि “बाबा वाक्यं प्रमाणम!!: हे इथल्या जीवनाचे प्रमुख सूत्र मांडता येईल. ज्या प्रमाणे मुली नको तितक्या पुढारलेल्या आहेत, त्याच प्रमाणे मुले देखील, अमेरिकन संस्कृतीचे तसेच अनुकरण करीत आहेत,  न्यूयॉर्क मधली fashion हा इथल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. केसांचे वळण(जीवनाला कसलेच “वळण” नाही!!), कपडे त्याच प्रमाणे घालायचे इत्यादी.  एक गंमत सांगतो, इथे, […]

बेजोड तोडी

पंडित भीमसेन जोशी आणि राग तोडी याचे नाते फार जवळचे आहे. त्यांच्या गळ्यावर जणू हा राग कोरलेला आहे!! एकतर पंडितजींचा गळा हा मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकतो. याचा परिणाम असा, तोडीसारखा सर्वसमावेशक राग, त्यांच्या कडून ऐकणे ही नेहमीच सुखद संवेदना असते. घुमारेदार आणि आश्वासक सूर ही तर पंडितजींच्या आवाजाची खासियत आहे. […]

साउथ आफ्रिका-भाग 3

मागील भागात, मी इथल्या भारतीय वंशाच्या समाजातील पुरुषाबद्दल थोडे लिहिले. खर तर, इथल्या भारतीय लोकांच्यात “न्यूनगंड” प्रचंड प्रमाणात आहे. तो त्याच्याशी बोलताना सतत जाणवत असतो. कुठल्याही विषयात, आपल्याला प्रचंड माहित अथवा ज्ञान आहे, असा ते फार चलाखीने भास निर्माण करू शकतात. प्रत्यक्षात, ते चक्क खोटे बोलत असतात. त्यांना त्यात काय आनंद मिळतो, याचा मला अजूनही पत्ता […]

मन:स्पर्शी भटियार

वास्तविक आपल्या भारतीय रागसंगीतात, सकाळच्या पार्श्वभूमीवर बरेच राग ऐकायला मिळतात तरी देखील भटियार ऐकताना, आपल्या मनात नेहमीच सात्विक भाव येतात, अर्थात हा सगळा संस्काराचा भाग आहे. “पूरब से सूर्य उगा” आणि ऐकताना आपलेच मन ताजेतवाने होते. त्या गाण्याचे सूर मात्र अतिशय सुरेख, मनात भरणारे होते आणि याचे श्रेय, संगीतकार अशोक पत्की यांचे. हेच सूर, आपल्याला “भटियार” रागाची ओळख करून देतात. […]

1 65 66 67 68 69 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..