नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

साउथ आफ्रिका – भाग २

साधारणपणे महिन्या दोन महिन्यात मी बराचसा रुळलो, असे म्हणायला हरकत नाही. पीटरमेरीत्झबर्ग गाव हे तसे एकदम टुमदार असे गाव आहे. जवळपास, सात, आठ टेकड्यांवर वसलेले आहे आणि समुद्र सपाटीपासून बरेच उंच असल्याने, हवा थंडगार असते, अर्थात, डिसेंबर, जानेवारी हे महिने वगळता. मी, मुंबईचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवून या शहरात आलो असल्याने, इथला उन्हाळा देखील मला चांगलाच भावला. […]

रंग चिकित्सा – भाग २

‘रंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते.  उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात. […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग २

आपणास उत्सुकता आहे ती ‘वास्तुशास्त्र पेंटिंग’ म्हणजे काय ? आणि त्या पेंटिंग्स मुळे खरंच काही अपेक्षित परिणाम मिळतो काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची…!!  बरोबर ना… !! तेच आता आपण पाहू. […]

असा हा खारीचा वाटा.

नुकताच पावसाळा सुरु झालेला होता. पावसाच्या सरी सारख्या अधून मधून पडत होत्या. सर्वत्र हिरवळ दिसू लागली होती. थोड्याच दिवसांनंतर त्या हिरवळीचे धागे,  निसर्ग दाट व पक्के करणार. आणि एक अप्रतिम हिरवागार असा गाल्लीचा सर्व उघड्या रानोमाळ जागांमध्ये पसरुन टाकल्याचा आनंद निर्माण होणार. हा गाल्लीचा, त्या वर्षाऋतूच्या स्वागता साठीच असावा. अशा हलक्या फुलक्या अगमन प्रसंगीच्या नव पावसाळी […]

साउथ आफ्रिका – भाग १

खरतर, साउथ आफ्रिकेसंबंधी लिहायचे म्हणजे थोडक्यात माझेच वर्णन करायचे, असा थोडाफार प्रकार होण्याची शक्यता आहे. अर्थात, मी थोडीफार तठस्थ वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण, काही ठिकाणी, माझा आणि माझ्या मतांचा उल्लेख अनिवार्य ठरावा. तेंव्हा, तेव्हढी सवलत,तुमच्याकडून  अपेक्षित आहे. […]

विक्लांत अहिर भैरव

“मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे. […]

व्रतस्थ भैरव

भैरव राग, हा भारतीय संगीतातील अति प्राचीन रागांपैकी एक राग मानला जातो. पुढे, रागांचे वर्गीकरण करताना, “भैरव” नावाचा “थाट” निर्माण केला आणि त्याच्या आजूबाजूचे राग त्यात सामावून घेतले. खऱ्या अर्थाने “संपूर्ण-संपूर्ण” जातीचा राग आहे आणि यात, “निषाद”,”धैवत” हे दोन स्वर कोमल लागतात तर बाकीचे पाचही स्वर शुद्ध स्वरूपात, या रागात वावरत असतात. वादी स्वर “धैवत” तर संवादी स्वर “रिषभ” आहे. […]

नेल्सन मंडेला – जन्मशताब्दी

दक्षिण आफ्रिकेचे सुदैव असे की, जेंव्हा सत्तापालट झाला तेंव्हा त्या देशाला मंडेला सारखा सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता मिळाला. त्यामुळेच नव्या राजवटीत कुठेही अनागोंदी झाली नाही आणि संक्रमण शांततेत पार पडले. इतर आफ्रिकन देशांचा अनुभव बघता, मंडेला यांचे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी असेच म्हणायला हवे. […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – एक अद्भुत रसायन

अनेकविध व्याधी, चिंता, तणाव आणि या विषयांच्या सर्व समांतर प्रश्नांना कमीत कमी तीन महिने आणि अधिकाधिक सहा महिने एवढ्या कालावधीत सकारात्मक प्रतिसादाने `उत्तर’ वा `उपचार’ देणारा हा `हार्डवेअर’ आहे. असं अनुभवांती तसेच १९९६ पासूनच्या अद्भुत अनुभवांच्या `डेटाबेस’वर… खात्री देऊन सांगता येण्याची हिंमत या `हार्डवेअर’द्वारे म्हणजेच `वास्तुशास्त्र पेंटिंग’द्वारे करता येते. असं नम्रपणे कथन करू इच्छितो ! […]

रंग चिकित्सा – भाग १ – एक आश्वासक उपचार

…. आता मात्र एक मार्ग जो पूर्वी होताच  फक्त आपल्याला माहिती नव्हता – “रंगचिकित्सा”..  !!  “रंगोपचार”…  म्हणजे काय?  तर रंगांपासून आपल्यावर आपण उपचार करून घेतो. आपण आस्तिक असो वा नास्तिक, कुठल्याही वयोगटाचे  अन् आर्थिक उत्पन्न गटाचे. आपण कुणीही असा. आपली प्रकृती कुठल्याही प्रकारची असो…  रंगोपचारांना प्रतिसाद हा मिळतोच मिळतो – उपचारकर्त्यांकडून…!! […]

1 66 67 68 69 70 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..