भारताच्या माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना १९ मे दिल्लीच्या एका न्यायालयाने ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. […]
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती झाल्यास कोट्यवधी रुपयांची सामग्री ही मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार होणार आहे, त्याकरता तिन्ही सैन्यदलांनी एकत्रित विचार करुन धोरण आखले जाइल. तर पुढील काही वर्षात देशाला कशाचा धोका आहे याचा विचार करुन किती शस्त्रास्त्रांची गरज आहे हे लक्षात घेऊन शस्त्रास्त्र निर्मिती करता येईल. देशांतर्गत शस्त्रास्त्रांची निर्मिती झाली तर अर्थातच आपल्या खर्चात बचत होईल. तसेच लढाईत एकत्रित नियोजन करुन लढल्यास त्याचा निश्चितच फायदा होइल. […]
भेट देणाऱ्याच्या दृष्टीने अगदी लहान असलेली ’भेट’, भेट दिलेल्याला काय मिळवून देईल, ते सांगता येत नाही..त्याचे हे दोन किस्से. एक मित्राने सांगीतलेला, तर दुसरा मी स्वत: अनुभवलेला.. […]
आपल्या राजकारणाची पातळी किती घसरलीय ह्याची ही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी उदाहरण आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू, मुसलमान आणि एकूणच सर्व समाजातील लोकांनी आणि विविध नेते/पक्षाच्या आंधळ्या फाॅलोअर्सनी या प्रकरणात भावनांच्या आहारी न जाता, हे नेमकं काय राजकारण शिजत आहे हे समजून घेऊन वागण्याची आज गरज आहे. […]
२०१८ आणि २०१९ मधे होणार्या निवडणुकात बांगलादेशींना बांगलादेशात परत पाठवणे हा एक महत्वाचा मुद्दा म्हणुन पुढे आला पाहिजे. भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात बोलायला भारतातील राज्य सरकारे, बहुतेक राजकीय पक्ष,नोकरशाही आणि वृत्तपत्रे तयार नाही. बांगलादेशींना Detect करणे, त्यांची नावे मतदारयादीतून Delete करणे व त्यांना बांगलादेशात Deport करणे हाच यावर उपाय आहे. […]
अमेरिकेप्रमाणे आपण भारतातून परदेशात जाणार्या पर्यटकांनाही अशा धोकादायक देशांविषयी, तेथील परिस्थितीविषयी माहिती देणे, इशारा देणे गरजेचे आहे. अशांत देशांतील भारतीयांची सुरक्षा,धोकादायक परिस्थितीमध्ये बाहेर काढण्यासाठी इव्हॅक्युएशन प्लॅन आणी भारताची ‘होस्टेज रेस्क्यु पॉलिसी लवकरात लवकर तयार करुन त्याची वेळोवेळी रिहर्सल करणे व जरुरी पडल्यास त्यावर अंमल बजावणी करणे जरुरी आहे. […]
कोणत्याही कलावंताला मी देवाचा पृथ्वीवरचा अंश (अवतार नव्हे, अवतार भ्रष्ट असू शकतो) मानतो आणि म्हणून प्रभाकरपंतानी काढलेलं माझं व्यंगचित्र मला साक्षात देवाचा आशीर्वादच वाटतो.. देवाचा आशिर्वाद असाच अचानक मिळत असतो, तो ओळखता आला पाहिजे मात्र..!! […]
माणूस आयुष्यभर कमाईसाठी मरत असतो.यासाठी आयुष्यभर शरीराचे हाल करून पैसा कमवितो…नि म्हातारपणी तो मिळविलेला पैसा शरीराच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करतो…शेवटी गोळाबेरीज करताना हाती उरतं एक मोठ्ठ शून्य… […]
डिफेन्स पार्लमेंटरी समितीने सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांच्या नोकरीच्या पहिले पाच वर्षे ही सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. यामुळे सैन्यदलात असलेली मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल. […]