२)प्रत्येकाला परमेश्वराने जन्म देताना आपआपला तळहात नि तेवढाच पसा दिला आहे.ज्याच्या त्याच्या ओंजळीत मावेल इतकंच पाणी त्याला पिता येतं.हव्यासापोटी कुणी कितीही ओरबाडून घागरभर पाणी पदरात पडून घेतलं,तरी पसाभर सोडून बाकी सारं वाहून जातं.अखेर जाताना तेवढा पसाभरही काही न्यायचा परवाना नाही ………या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर आपल्याला आपलं नाव का बरं कोरता येऊ नये—–सतत काहीतरी मागणं मागत राहायचं […]
१)आयुष्यातील सगळी गणितं निव्वळ बेरीज,वजाबाकी,गुणाकार आणि भागाकार यांच्या मदतीने सुटत नाहीत वा उत्तराबद्दल ठाम भाकीत करता येत नाही.या गणिताचं संपूर्ण ज्ञान आणि भरपूर सराव काही हमखास उत्तरं मिळवण्याचा मार्ग नव्हे.शेवटी नियतीनं तिच्यापाशी राखून ठेवलेला एक हाच्चा सगळी गणितं सोडवीत असतो . आणि याच हाच्च्याचा ज्याला अर्थ कळला त्याला आयुष्यभर गणिताची भीती उरत नाही.— गणित हा सरावाचा […]
आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही […]
फ़ेब्रुवारी, मार्च महिना हा भारताच्या लूक ईस्ट आणि लूक वेस्ट या दोन्ही धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये ११ मार्चला तब्बल १४ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. […]
नुकतीच देशात काही पुतळे उखडायची किंवा पुतळ्यांची नासधूस करायच्या काही लहान-मोठ्या घटना घडून गेल्या. जगभरात कधी ना कधी हे होतंच असतं. आता हे चुक की बरोबर, यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही आणि माझी ती पात्रताही नाही आणि या लेखाचा तो विषयही नाही. […]
भारताने तूर्त मालदीववर कठोर निर्बंध घालून तेथे लवकरात लवकर निवडणुका होतील याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून तेथील लोकशाही जिवंत राहू शकेल. चीन व पाकिस्तान यासारख्या शत्रूंची तेथील उपस्थिती आपल्याला घातक ठरेल. त्यामुळे परराष्ट्र नीती हे आव्हान ठरते आहे. मालदीवमधील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवत भारत सावधगिरीने पावले टाकील यात शंका नाही. […]
श्रीदेवीचा दुबईत अपघाती मृत्यू झाला आणि ती बातमी आपल्या रिकामटेकड्या लोकांच्या देशात एकदम महत्वाची झाली. क्षणात आपल्या सर्व वैयक्तिक आणि राष्ट्रीय समस्या शुल्लक झाल्या आणि तीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असावं, याची चर्चा करणं राष्ट्रीय महत्वाचं झालं. टिव्हीवाले Barking News म्हणून जोरजोरात भुंकू लागले आणि आपण खुळे त्या अर्धवट समालोचकाचं कोणतही आगापिछा नसलेलं म्हणणं ऐकून आपापली […]
मराठी माणसाला भांडल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. फक्त दुर्दैव येवढच, की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे. […]
‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते. […]
वाळकेश्वरच्या सुप्रसिद्ध रस्त्यावरील ‘तीन बत्ती’ तिठ्यापाशी वाळकेश्वर या ऐतिहासिक परिसराची माहिती देणारा एक स्टीलचा फलक एका खाजगी संस्थेने लावलेला आहे. या फलकावरील मराठी भाषेतील माहिती, माननीय राज्यपालांचे जन संपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. या पाटीवरील लिखाणासाठी माझं नांव त्या पाटीवरील माहितीखाली लिहून मला श्रेयही देण्यात आलं आहे. श्री. उमेश काशिकरांच्या या औदार्याबद्दल मी त्यांचा आणि त्या संस्थेचा आभारी आहे..! दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची अहमिहीका लागलेल्या आजच्या दिवसांत असं औदार्य दुर्मिळ आहे आणि म्हणून त्याची किंमत मोठी आहे.. […]