नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट..

मुंबई शहरात विविध ठिकाणी दिसत असलेला हा संदेश नेमका कसला आहे आणि तो कोणी लिहिला आहे हे शोधून काढण हे तपास यंत्रणांच काम आहे व ते ते करतही असतील असं मी समजतो. याकडे आपलं लक्ष वेधून घेणं मला आवश्यक वाटलं, म्हणून हा लेखन प्रपंच. […]

पक्षाना मेजवानी

मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या    चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून […]

आदरणीय बाबासाहेब..

आदरणीय बाबासाहेब.. तुम्ही आयुष्यातील पहिले कर्ज पुस्तकांसाठी घेतले होते, असे एकदा कानावर आले होते. ते आम्हीही जयंती मयंतीला सांगतो. अगदी टाळ्यांच्या कडकडाटात !! पण चुकून कधीही पुस्तकाला हात लावित नाहीत. मला सांगा, पुस्तकांनी कुठे पोट भरते का? इतर पुस्तकांचं जाऊ दे तुमच्या दक्ष निगराणीखाली तयार झालेली भारताची राज्यघटना तरी उठ-सुट तुमचं नांव घेणाऱ्या किती जणांच्या घरी […]

स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

जन्मताच स्त्रीची सर्वांगीण ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तिच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तिचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे. […]

महाराष्ट्राची सागरी सुरक्षा आणि सुधारणा

‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून दहा दहशतवादी हिंदुस्थानी नौदल, तटरक्षक दल, सागरी पोलिसांना चकवून मुंबईत किनाऱ्यावर येऊ शकले. त्यानंतर वर्तमान सागरी सुरक्षा प्रणालीत असलेल्या उणिवा दूर करण्याकरिता अनेक उपाय घोषित केले. या हल्ल्याला उद्या नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांनंतर सागरी सुरक्षेत घडून आलेल्या सुधारणांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. […]

गाढव कायदा आता मानव होऊ द्या !

मी कायद्याचा जाणकार नाही. परंतू जे नजरेला दिसलं, त्यावरून मला हे लिहावसं वाटलं. माणसं, माणसं असताना कायदा गाढव होता हे ठिक आहे. पण आता माणसं गाढवासारखी वागू लागल्यावर, कायद्याने आता माणसासारखं वागायला हरकत नसावी, एवढंच मला सुचवायचं आहे..!! […]

कुटुंब आणि आजची स्त्री

कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथंम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत एवढ्या त्या एकरुप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतू स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. माझे मालवणीतून अर्थवाही कविता करणारे मालवण स्थित कविमित्र श्री. विनय सौदागर यांनी […]

रमी

पत्त्यांचे अनेक खेळ आहेत त्यात, रमी हा खेळ आपल्या जीवनाशी बराचसा निगडित आहे, म्हणून तो मला बाकीच्या पत्यांच्या खेळापेक्षा थोडा हटके वाटतो. या खेळात जीवनाची अनेक सूत्रे सापडतात. प्रत्येक खेळाडू यात पत्ते वाटतो….त्याला ते वाटावेच लागतात, याचा अर्थ त्याला जीवनाच्या सारीपाटात सूट नाही. जर हा खेळ पुढे सुरू ठेवायचा असेल तर, स्वतःची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावीच लागते. […]

‘ध्वनी’ – एक ईश्वरी उर्जा

सुर्यास्ताची वेळ होती. समोरचे नैसर्गिक द्दष्य टिपत बाकावर नामस्मरण घेत बसलो होतो. हाती मन्यांची माळा होती. सैरावैरा धावणारे मन केंव्हा सुर्यास्ताकडे, वा माळेकडे वा सभोवतालच्या परिसराकडे जात होते. थोड्याश्या अंतरावर एक तरुण हाती गितार घेऊन एका जुण्या गाण्याची धुंद वाजवीत होता. आम्ही दोघे समान परीस्थितीचे सहप्रवासी होतो. माझे नामस्मरण व ईश्वरी आराधनेत लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न. […]

वेळेची एक संकल्पना

वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी वेळ लागते. त्यामुळे वेळ व हालचाल अर्थात Time and Movement ह्या एकच समजल्या गेल्या. हे शारीरिक                स्थरावर. मानसिक स्थरावर ही संकल्पना वेगळी ठरते. दोन प्रश्न आहेत. १) काय ?   अर्थात काय असावे .   २)  कसे […]

1 73 74 75 76 77 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..