काश्मीरमध्ये राजकीय पक्षांना आणि तथाकथित विचारवंतांना देशाच्या विरोधात बोलण्यासाठी कुठलेही कारण पुरेसे ठरते. आता नवे कारण म्हणजे राज्यघटनेतील 35 अ हे कलम. यावरून आता वादविवाद सुरू झाला आहे. इतर वेळी एकमेकांशी भांडणारे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि इतर अपक्ष सदस्य याबाबत एकत्र आले आहेत. […]
पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्… […]
ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. […]
मध्य रेल्वे माझं नाव वय माझं शंभरवर, काय सांगू बाबांनो आता कशी लागली मला घरघर… इंग्रजांच्या काळात खूप होती माझी बडदास्त फेऱ्याही होत्या कमी अन् माणसंही नव्हती जास्त… रुळावरून धडधडत आले की लोक मला घाबरायचे एक भोंगा वाजवताच दूर दूर पळायचे… पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळंच तंत्र बदललं शहरांचा झाला विस्तार माझं महत्त्व वाढलं… मी खूप खुशीत […]
फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात….- …अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणुस “चाललो हो शेट मी आता…” असं म्हणुन निघाला की कसंतरीच होतं. ….जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं ….आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं.. ….गणपती विसर्जनाचे वेळी “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना […]
हातावर पोट असणारा तो ऑटोचालक, जो माझ्यासाठी तासभर सवारी सोडून थांबला…मला चहा आणून देणारा हा कंडक्टर आणि मी नवऱ्यासोबत कारमध्ये बसली आहे याची खात्री केल्यावर शिवनेरी काढणारा ड्रायव्हर हे माझे कोण होते… […]
जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे […]
२६ जुलै २०१७ ला कारगिल युद्धाला १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. […]
श्रद्धेची चिकित्सा करू नये. मलाही करायची नाही. मला या लेखात ‘कौल’च्या योग्यायोग्यतेबद्दल बोलायचं नाही. मला तसा अधिकारही नाही, कारण मी कधी कौल लावला नाही व कुणी लावताना तिथं हजरही नव्हतो. मला तुम्हाला सांगायचंय ते ‘कौल’ या शब्दाबद्दल, या शब्दाच्या जन्माबद्दल…! […]