नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

राऊळ – एक आडनांव

आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा ज्ञातीतलं एक आडनांव. कुडाळ नजिकच्या पिंगुळीच्या ‘राऊळ महाराजां’मुळे सर्वदूर परिचित आडनांव. गुजरातेत आढणारं ‘रावळ’ किॅवा ‘रावल’ आडनांव म्हणजे राऊळचंच गुजराती व्हर्जन.. […]

मन कि बात – तज्ज्ञ

‘तज्ज्ञ’ या कुळाबद्दल मला नितांत आदर वाटतो. मलाही त्यांच्याप्रमाणे तज्ज्ञ होता यावं यासाठी मी नेहेमी प्रयत्नशील असतो. तज्ज्ञ कसं होता येतं, हे मला फारसं कळत नसलं तरी त्यासाठी खुप म्हणजे खुपच अभ्यास करावा लागतो हे ऐकीव माहित होत. अभ्यास, तो ही साधासुधा नव्हे, तर जाड जाड ग्रंथातून, हे ही ऐकुनच माहित होतं. असं काहीबाही ऐकून माझी छाती (फक्त ३५ इंचं असलेली) दडपून जाते. […]

प्राजक्त

मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं. […]

रक्त आणि रोग निदान

एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व  क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या […]

तत्त्वांशी बांधिलकी 

१९७५ च्या अखेरीस त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व तो त्या संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. आमच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे त्यानंतर अनेक वर्षे आमची भेट झाली नाही, पण आज त्यानेच तो योग जुळवून आणला होता. […]

तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा

नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना […]

अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला; तेजोभंगाचा एक मार्ग

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यावरून मला, का कोण जाणे, पण यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन उर्फ गझनीच्या महमूदाने सोमनाथावर केलेल्या हल्ल्याची आठवण होते. अमरनाथ आणि सोमनाथ, दोन्ही भगवान शंकराची नांवं. भगवान शंकर हे या देशाचं आराध्य दैवत. आसेतूहिमाचल कुठेही गेलो तरी महादेवाचं मंदीर, अगदी गेला बाजार एखादं शिवलिंग हमखास सापडणार. देशातलं कोणतंही गांव याला अपवाद […]

मन कि बात – ओळख

नुकतेच दहावी-बारावीचे रिझल्ट लागले. दरवर्षी याच महिन्यात थोडेसे पुढं-मागे होऊन लागतात. निकाल पास अथवा नापास असाच लागणार असला, तरी उत्सुकता, हुरहूर, टेन्शन असं सारं काही होतंच. अर्थात मी सांगतोय ते पूर्वीचं, तेंव्हा पास-नापास येवढ्या दोनच कॅटेगरी असायच्या. बाळंत होणाऱ्या बाईला कशा मुलगी किंवा मुलगा होणार या दोनच शक्यता असतात, तरी काय ती उत्सुकता असते सर्वांना, तसंच […]

ती बाई

येता जाता रस्त्यावरच्या कुठल्याही कुत्र्या-मांजराच्या डोक्यावर हात फिरवून, त्याला एखादं बिस्कीट भरवणारा मी, एका जीवंत माणसाशी बोलायला का बिचकतो, हे माझं मलाच कळत नाही. कदाचित महसत्ता होऊ घातलेल्या देशाचा, पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याच्या विवंचनेत असलेला प्रतिष्ठीत नागरीक असणं, हे मला तसं करू देत नसावं, कुणास ठावूक? […]

माय – लेक

मुली कशा खूप बडबड करतात, हक्काने राग, लोभ, प्रेम व्यक्त करतात. पण मुलांना हे जमत नाही तर आपण त्यांना गृहितच धरू लागतो ……म्हणून मुलग्यांचं कौतुक करण्यासाठी ही खास पोस्ट. […]

1 78 79 80 81 82 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..