नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

किचन क्लिनीक – गहू

पंजाब मध्ये प्रमुख आहार घटक असलेले हे धान्य कधी आपण कोकण गोवा प्रांतीय मंडळींनी आपलेसे केले हे आपले आपल्यालाच समझले नाही. तरी आता आपल्या प्रदेशामध्ये देखील बरीच मंडळी वेगवेगळ्या स्वरूपात ह्याचे सेवन करताना पण पहातो.जसेरवा,सांजा,पिठ,खीर,पुरी, चपाती,पराठा,लाडू इ. म्हणूनच ह्या गव्हाचे गुण धर्म आपण ह्या सदरात पाहुया. गहू चवीला गोड,थंड,पचायला जड,स्निग्ध,सारक,वात पित्त नाशक,कफकर,बलकारक,वजन वाढविणारे,मोडलेले हाड सांधायला मदत करणारे […]

किचन क्लिनीक – काही दुधांचे उपयोग

अ) गाईंचे दुध: १)गुळवेलीच्या काढ्यात गाईंचे दुध घालून काढा आटे पर्यंत दुध उकळावे व ताप येत असणाऱ्या व्यक्तींचा पिण्यास द्यावे. २)पोटात काही गंभीर आजारामुळे पाणी झालेल्या रूग्णाला इतर औषधांसोबतच नियमीत गाईचे दुध पाजावे फायदा होतो. ३)पोटात आग होणे,पोट दुखणे,काही खाल्ल्यावर बरे वाटणे ह्या तक्रारीमध्ये कोमट दुध,खडी साखर व गाईचे तूप हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस थोडे […]

किचन क्लिनीक – तांदुळ

कोकण गोवा केरळ प्रांतातील जनतेचे आहारामधील प्रमुख घटक होय.ह्याचा नुसता भातच नव्हे तर ह्या पासून अनेक पदार्थ बनविले जाता जसे पुलाव,बिर्याणी,साखरभात, घावन,इडली,डोसे,भाकरी,पायस इ.आणी प्रत्येक रूपात ह्याची चव अप्रतीम लागते. ह्याचे उकडे,सुरे असे दोन प्रकार असतात.तसेच ह्याच्या अनेक पोटजाती देखील असतात जसे कोलम,सोनामसुरी,बलम,बासमती इ.आणी हो प्रत्येक तांदुळाची चव वेगळी लागते बरं का. सर्व प्रकारच्या भातामध्ये साठे साळी […]

किचन क्लिनीक – काही दुधांचे गुणधर्म

आयुर्वेदामध्ये अनेक दुधांचे गुणधर्म सांगितले आहेत.पण त्यातील जे दुध मानव प्राणी प्यायला वापरतो तेवढ्याच दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखात पहाणार आहोत. १)गाईंचे दुध: हिचे दुध चवीला गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,शरीरात क्लेद व चिकटपणा अल्प प्रमाणात निर्माण करते,कफकर,वातपित्त कमी करणारे, संडासला व लघ्वीला सुकर करणारे,मानसिक आजारबरेकरणारे,दाहनाशक,शक्तिवर्धक, विषनाशक(असे म्हणतात कि जर गाईने चुकून एखादी विषारी वनस्पती खाल्ली तरी त्याचे विष हे गाईच्या […]

वेश्या व राजकारणी

दिवसेंदिवस घसरत चाललेली राजकारणाची पातळी मला मुंबईच्या कामाठीपूरा, फोरास रोड, पिला हाऊस या परिसरातील ‘वेश्या’ बाजाराची याद दिलवते..फरक एकच, या परिसरात बसलेल्या वेश्या बऱ्याचश्या बळजबरीने व काही पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या व्यवसासात आलेल्या असतात. खरं तर वेश्या आणि राजकारणी यांची तुलना करून मी वेश्यांचा अपमान करतोय याची मला जाणीव आहे. वेश्या -बळजबरीने वा नाईलाजाने- एकदा […]

आपल्या मापाचे कपडे कोण शिवणार ?

निवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं. परंतू नागरीकांना काय हवंय याचा विचार कुणीच केलेला दिसत नाही, करतानाही दिसत नाही..! प्रत्येक वाॅर्ड मुंबईचाच हिस्सा असला तरी प्रत्येक वाॅर्डाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, असतात. एखाद्या वाॅर्डच्या गरजा काय आहेत हे […]

सॅबोटाज ,सबव्हर्जन आयएसआयची नवी रणनिती

पाकिस्तानने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या छुप्या युद्धाचा आणखी एक प्रकार नेपाळमध्ये पकडलेल्या आयएसआय एजंटाकडून समोर आलेला आहे. देशाविषयीची संवेदनशील माहिती शत्रूपर्यंत जायला नको (सिक्युरिटी ऑफ इन्फर्मेशन), नागरिकांना दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणे (सबव्हर्शन) आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान (सॅबोटाज) या तीन पातळ्यांवर पाकिस्तानी आयएसआय सध्या आपल्या देशाला धोका पोहोचवत आहे. आंध्र प्रदेशमधील कुनेरूजवळ जगदलपूर – भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसचे आठ डबे […]

राष्ट्रीय रायफल्सची टीम व अशोक चक्र विजेता

जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत.जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. 25 जानेवारी संध्याकाळी दोन मोठे हिमस्खलन झाले होते. पहिल्यांदा सैन्याचा एक कॅम्प हिमस्खलनात अडकला. त्यानंतर गस्तीवर असलेले काही […]

देवा, आम्हाला कायम दु:खात ठेव..

आपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत. रिक्शा-टॅक्सीवाले, वेटर यांच्याशी तरी कुठे लोक बोलतात..! बोलणं जाऊ देत, बघतही नाहीत कधी..वरचा माणूस खालच्या माणसाशी बहुतेक वेळा […]

1 88 89 90 91 92 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..