ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते. व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे. ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात […]
आता आपण खोबरेल तेलाचे घरगुती उपयोग पाहूयात: १)खोबरेल तेल व चुन्याची निवळी हे मिश्रण घोटून केले मलम केसांना लावल्यास केस गळणे थांबते. २)थंड हवेशी संपर्क आल्याने त्वचा फुटते ह्या करीता खोबरेल तेल व लोणी हे मिश्रण समभाग मिसळून त्वचेवर लावावे. ३)खोबरेल तेल अंगाला नियमीत चोळल्यास मांसपेशी व स्नायू पुष्ट होतात. ४)संडास करताना व नंतर गुदद्वाराची आग […]
आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात: १)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे. २)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे. ३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट करतात. ४)गोवा कोकण भागामध्ये नारळाचे दुध काढुन त्यात […]
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी!हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी हि रसरशीत जांभळे देखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घरकरून आहेत.मीठ लावून हि जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे म्हणजे एका अभूतपूर्व सुखांची अनुभूतीच जणू. ह्याचा १०० फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने ३-६ इंच लांब भालाकार,स्निग्ध,चमकदार असतात.फुले हिरवी सफेद सुगंधित […]
आपण सेवन करत असलेल्या त्रिफळा चुर्णामध्ये देखील हरडा व बेहड्या सोबत आवळा असतो. आवळ्याचे २०-२५ फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने चिंचेच्या पानांप्रमाणे असतात व ह्याला पिवळी फुले गुच्छ स्वरूपात येतात.फळे गोलाकार,मांसल पिवळसर हिरवी व आत टणक बी असणारी असतात. ह्याच्यात खारट सोडुन बाकी पाच ही चवी असतात व त्यात आंबट चव प्रमुख असते.हा थंड गुणाचा असून […]
आता शहाळ्याचे काही घरगुती उपाय पाहुयात: १)जुलाब होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात १/४ कप संत्र्याचा रस ४ चमचे लिंबू रस व १/४ चमचा सैंधव घालून प्यावे हे मिश्रण ओ.आर.एस ची भूमिका बजावते. २)लघ्वीला जळजळ होत असल्यास व लघ्वी कमी होत असल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे. ३)लहान मुलांना जंतांचा त्रास होऊन उल्टी होत असल्यास १/४ कप शहाळ्याचे […]
चिंचेचा उपयोग आपल्या स्वयंपाकात बऱ्याच प्रमाणामध्ये केलजातो.आमटी,भाजी,चटणी, पाक,सरबते,तसेच आता तर इमली जेली देखील मिळू लागली आहे.चाट चे पदार्थ तर चिंच खजुर चटणी शिवाय कल्पनाच केली जाऊ शकत नाही. अगदी बाई गरोदर असेल तर तिला देखील चिंचा खाव्याशा वाटतात का विचारले जाते. चिंचेचा मोठा वृक्ष असतो साधारण पणे आवळ्याच्या पानां प्रमाणे बारीक पाने असतात.तसेच त्याला लागलेली कच्ची […]
आवळा ह्याला आयुर्वेदा मध्ये आमलकी किंवा धात्री असे म्हणतात.धात्री अर्थात आई किंवा माता जी आपल्या अपत्यांचे भरण पोषण करते.आणी आयुर्वेदामध्ये आवळ्याला देखील असेच महत्त्व आहे कारण हा आवळा आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी व आपले पोषण वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यास करतो ह्यात वाद नाही. आयुर्वेदामध्ये आवळ्याला रसायन औषधी असे देखील म्हटले जाते.कारण रसायन औषधी ह्या आपल्या शरीरातील सात […]
नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो. माडाचा बुंधा […]
कोकमाची झाडे आपल्याला कोकण गोवा प्रांतामध्ये पुष्कळ पाहायला मिळतात.असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये कि कोकमा शिवाय कोकणी व गोयंकार माणसाचा स्वयंपाक पुर्ण होऊ शकत नाही. कोकमाची फळे हि सुकवून त्याची सोले स्वयंपाक व औषधात वापरतात.आमटी,काही भाज्या,तिवळ,नारळाचा रस घालून केलेली सोल कढी,आगळ,कोकम सरबत इ अनेक प्रकारे आपण कोकमाचा वापर करतो. ह्याचा सदाहरीत,पातळ नाजूक फांद्या असलेला वृक्ष असतो.ह्याची […]