अंजीर हे फळ ओले अथवा सुक्यामेव्यात जगभर प्रसिध्द आहे.तसेच बऱ्याच लोकांचे हे आवडते फळ आहे.ह्याचे काळे व लाल असे दोन प्रकार आहेत.आता तर ड्रायफ्रूट मिठाई मध्ये अंजीर हमखास वापरतात,तसेच सुक्या अंजिराचे शेक देखील केले जाते. अंजिराचे १२-१५ फुट झाड असते व त्याला वसंत ऋतुमध्ये फळे लागतात व ग्रीष्म ऋतुमध्ये ती पिकतात.ह्याची पाने आकाराने मोठी व काळपट […]
शबरीने श्रीरामांना स्वत: चाखून अर्पण केलेली ही बोरे श्रीरामांनी अगदी आवडीने खाल्ली होती. खरोखरच हि बोरे फारच रूचकर लागतात व विशेष करून उन्हाळयात मिळणारे हे रान फळ आहे. ह्याचा मध्यम आकाराचा वृक्ष असतो जो काटेरी असतो व त्याला छोटी छोटी काटेरी पाने असतात. कच्ची बोरे हि चवीला तुरट आंबट उष्ण असून ती शरीरात कफ पित्त दोष […]
हे फळ जरी भारतीय नसले तरी त्याने आपल्या स्वयंपाक घरात एक महत्त्वाचे स्थान त्याने प्राप्त केले.असा कुठलाही पदार्थ नाही ज्या मध्ये आपण ह्याचा वापर करत नाही भाजी असो,आमटी असो,उसळ असो किंवा भाजी असो टाॅमेटो घातला की त्या पदार्थांची चव भलताच वाढते. तसेच आता टाॅमेटो चटणी,सलाड,साॅस,केचअप तसेच बरेच चाटचे पदार्थ ह्यात हा हमखास वापरला जातो.तर असे लाल […]
हे लोकप्रिय फळ असून सर्वांनाच आवडते त्याला आपला पोपट तरी कसा अपवाद असेल.आपल्या सर्वांना ती बाल कविता आठवत असेलच “पोपट पोपट बोलतोस गोड खाना जराशी पेरूची फोड”. ह्याचा आता जाम,आयस्क्रीम,सरबत अस,वड्या असे बरेच रूचकर पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. पेरूचे सदाहरित झाड असते,पाने जाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर […]
हे फळ सगळ्यांना आवडते.दिसायला आणी खायला देखील सुरेख.साधारण अक्टोबर महिन्यात सुरूवातीला हि फळे बाजारात येतात.ह्याचे १०-१२ फुट उंच झाड असते व फळ ४-५ इंच व्यासाचे असते.बाहेर काळपट हिरवी साल असते व आत पांढरा सुगंधी गर व काळी बी असते. हे चवीला गोड थंड व पित्तनाशक असून वात व कफ दोष वाढविते. आता ह्याचे घरगुती उपचार पाहूयात: […]
पिकलेली पपई हि चवीला गोड,थंड असून पित्तनाशक असते. आता पिकलेल्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात: १)जेवणानंतर काही वेळाने पिकलेल्या पपईच्या १-२ फोडी खाल्ल्याने अन्न पचन सुलभ होते. २)बाळंतीण बाईला जेवणानंतर पपई खायला दिल्यास तिला भरपूर दुध येते. ३)ज्या स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी स्त्राव कमी होतो त्यांनी पपई खावी व ओटी पोटाला एरंडेल तेलाने मालीश करावे. ४)पपईच्या बियांचे […]
पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते.तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारा माही उपलब्ध असे फळ.ह्याचा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकतो मग शेक असो वा फ्रूट सलाड सगळ्याच हि पपई रूचकर लागते. तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व पिकल्यावर नुसतेच खायला छान लागते. ह्याचे १०-१२ […]
आसमान से टपके खजुर में अटके हि म्हण सर्वांनाच माहित असणार.तर हा खजुर आपल्या सर्वांचाच आवडता पण ह्याचे खरे राष्ट्रीयत्व अरब देश आहे बरं का.म्हणजेच काय तर हा परदशी पाहुणा आपल्या देशात आला आणी आपलाच बनून गेला. अत्यंत रूचकर फळ आपण सुक्यामेव्यात पण ह्याचा चांगलाच फडशा पाडतो नाही का.अत्यंत पौष्टिक देखील आहे हा.खजुराची चटणी अगदी कशावर […]
तसा कोहळा पौष्टिक असला तरी काही श्रध्दा अंधश्रद्धा ह्या फळाशी जोडल्या गेल्या आहेत जसे ह्याचा वेल बहरला आणी भरपूर फळे लागली कि ते अपशकुन मानला जातो,बऱ्याच घरात हा आणणे शिजविणे निषिद्ध असते.तसेच दृष्टबाधा होऊ नये म्हणून ह्याचे फळ धरा बाहेर बांधतात. एवढे चांगले फळ पण किती शापित बिच्चारे नाही का हो!बरे ह्याचा उपयोग खायला देखील केला […]
लिंबू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके फळ.ह्या फळाचा आपण खायला तर उपयोग करतोच जसे लिंबू सरबत,लोणचे ते हि वेग वेगळ्या प्रकारची,तसेच कोणत्याही पदार्थांची लज्जत वाढवायला ह्याचा रस आपण हमखास त्या पदार्थावर पिळतो.तसेच हे फळ फक्त खायलाच वापरले जाते असे नाही बरं का ह्या बिचाऱ्याचा उपयोग जारण मारण अर्थात काळ्या विद्येत करतात म्हणे,तसेच दृष्ट बाधा होऊ नये […]