नवीन लेखन...

मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांच्या उगमाचा मागोवा घेणारं हे सदर..

शब्दनाद – वाजले किती?

वाजले किती हा निदान आपल्या मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न. शहरी आयुष्यच घड्याळाच्या काट्याला बांधले गेल्याने हा प्रश्न आपण स्वतःला किंवा दुसऱ्याला विचारणे अत्यंत स्वाभाविक आहे. पण वेळ वाजताना कधी ऐकलीय का? मग वेळेला ‘वाजले’ हा शब्द का वापरला जातो? तर मित्रानो या ‘वाजले’चे मूळ आपल्या प्राचीन संस्कृतीत आहे. घड्याळांचा शोध लागण्यापूर्वी गावात किंवा नगरात लोकांना वेळेची […]

शब्दनाद – मुलगा, चिरंजीव, Son..

मुलगा. वंशाचा दिवा, कुलदिपक, संपत्तीचा वारस..काय काय नांवाने याला पुकारलं जात. भारतात कुठेही गेलात तरी ‘मुलगा’ हा शब्द अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला आपल्याला आढळेल ( केरळ व महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हे सन्माननीय अपवाद! इथे मुलग्यांची क्रेझ नाही) महाराष्ट्रापुरते बोलायचं झालं तर ‘मुलगा’ हा शब्द अगदी अस्सल मराठी मातीतला वाटतो. पण मित्रांनो, अस्सल मराठमोळा वाटणारा हा शब्द मुळचा […]

शब्दनाद – चिकू मारवाडी

‘मारवाडी’ या शब्दाचं ‘चिकूशी’ घनिष्ट मेतकूट असल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्यक्षात आपला संबंध घोलवडच्या खाण्याच्या चिकूशीच जास्तं येत असल्याने, राजस्थानातील मारवाड्याशी त्याचा काय संबंध, असा प्रश्न कधीना-कधी आपल्याला पडतोच. ‘मारवाड्या’चा अविभाज्य भाग असलेल्या ‘चिकू’चा आपण समजतो तसा खाण्याच्या चिकू नामक फळाशी काहीही संबंध नाही हे थोऽऽडा विचार केला तर लक्षात येतं. मारवाड्याचा संबंध कंजूसपणाशी येतो […]

‘शब्दनाद’ – बारसं..

अपत्याचं नांव ठेवण्याचा विधी. अपत्य जन्मानंतर जनरली १२ व्या दिवशी हा विधी पार पाडला जातो. आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा विधी ‘बाराव्या’ दिवशी करतात म्हणून त्याला ‘बारसं’ म्हणतात असे वाटते. मलाही असच वाटायचं पण नंतर शब्दांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी कळत गेल्या त्यापैकी एक ‘बारसं’ हा शब्द आहे. ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते जनांसी सांगावे..’ या […]

गांव, मौजे, खुर्द, बुद्रुक इत्यादी इत्यादी..

‘गांव’ या शब्दाचा जन्म कसा झाला, त्याचा अर्थ काय या प्रश्न मला सतावत होते. शब्दांचा मागोवा घेणे ही माझी खोड आहे आणि त्यानुसार मी या शब्दांचा माग काढत गेलो आणि मोठी विलक्षण माहिती माझ्या हाती आली.. मित्रांनो, ‘गांव’ हा शब्द चक्क ‘गाय’ म्हणजे ‘गो’ या शब्दातून जन्मला आहे. नाही ना विश्वास बसत? आता हा कसा जन्मला? […]

अल्जीब्रा..

शाळेत असताना बहुतेकांच्या जिवाचा थरकाप उडवणारा ‘अल्जीब्रा’ विषय म्हणजे सोप्या मराठीत बीजगणीत..!! ‘अल्जीब्रा’ हा शब्द आपण इंग्रजी आहे असे समजत असलो तरी तो मुळ अरबी शब्द ‘अल ज़ब्र’ या शब्दावरून तयार झाला आहे. या शब्दाचा अरबी अर्थ ‘तुटलेले भाग जोडणे’ असा आहे. गणितात नाही तरी आपणं दुसरं काय करतो..? अरबी गणितज्ञ ‘अबु ज़फ्र मुहम्मद इब्न मुसा […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..