नवीन लेखन...

Standerton – साउथ आफ्रिका – Dark Side – भाग २

जसजसा मी कामात रुळायला लागलो तशी, विशेषत: गोऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवायला जमू लागले. एक गोष्ट इथे मी स्पष्ट नक्की करतो. माझ्या बरोबरचे किंवा माझे वरिष्ठ जेंव्हा, तेंव्हा केंव्हा काम करीत त्यावेळेस, फक्त काम. अगदी प्रियकर/प्रेयसीचा फोन आला तरी जेव्हढ्यास तेव्हढे!! अर्थात, संध्याकाळचे ५.०० वाजले की ऑफिसच्या बाहेर!! इथे एकतर ऑफिस सकाळी ८.०० वाजता सुरु होते, त्यामुळे सगळेच, सकाळी लवकर […]

Standerton – साउथ आफ्रिका – Dark Side – भाग १

२००५ मध्ये, मी रस्टनबर्ग (इथेच जगप्रसिध्द “सन सिटी” आहे!!)  इथे नोकरी करताना, ध्यानीमनी नसताना, Standerton इथे नोकरी करायची संधी मिळाली. त्यातून, भारतातील प्रसिद्ध United Breweries या ग्रुपच्या इथल्या कारखान्यात फायनान्स विभागाचा प्रमुख म्हणून वरिष्ठ अधिकारी अशी म्हणून नेमणूक झाली. त्यामुळे, अर्थातच आनंद झाला. त्याचबरोबर इतक्या वर्षात संपूर्णपणे एकट्याने राहावे लागणार, हि जाणीव झाली. वास्तविक, या देशात मी १९९४ […]

प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग २

साउथ आफ्रिकेत मी एकूण १७ वर्षे राहिलो, अनेक लोकांशी ओळखी झाल्या, काही मोडल्या तरीही माझा प्रिटोरियामधील काळ हा सर्वोत्तम,असेच म्हणायला हवे. एकतर राहायला सुंदर घर मिळाले होते, बरेचसे भारतीय (माझ्यासारखे नोकरीसाठी आलेले) आजूबाजूला राहात होते, त्यामुळे गाठीभेटी (जरी नैमित्तिक असल्या तरी!!) होत असत. इथेच, मी पहिल्यांदा सिम्फनी संगीताची मैफिल प्रत्यक्ष ऐकली आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत घरी […]

प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग १

Standerton इथली खेळी संपली!! ती संपत असताना मला प्रिटोरियामध्ये नवीन नोकरी मिळाली होती पण ती join करण्याआधी, मी भारतात सुटीवर यायचे ठरले. येताना, मनात विचार आला, सुटीवर येत आहे तर महिंद्र कंपनीत “खडा” टाकून बघूया!! नाहीतरी महिनाभर तसा  उद्योग नव्हता. महिंद्रने नुकताच साउथ आफ्रिकेत बिझिनेस सुरु केला होता, तेंव्हा त्यांना माणसांची गरज तर लागणारच, असा हिशेब […]

डर्बन भाग २

डर्बन शहर तसे समुद्र किनारी वसलेले असले तरी उपनगरे मात्र डोंगराळ भागात आहेत. याचा परिणाम असा होतो, मुख्य शहरात डिसेंबर/जानेवारी मध्ये कडाक्याचे उन असले तरी उपनगरी भागात तितका कडाका जाणवत नाही. इथे आणखी एक गन्मात वारंवार बघायला मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात समजा सलग ३ दिवस उन्हाची काहिली (मुंबईच्या तुलनेत) झाली तरी ४ थ्या दिवशी हमखास पावसाची सर […]

डर्बन भाग १

मुंबई वगळल्यास, डर्बन असे शहर आहे, जिथे मी जवळपास ४ वर्षे राहिलो. भारतात, अनेक शहरांना भेटी दिल्या, काही दिवस राहिलो पण, शहराची “ओळख” काही झाली नाही. अगदी आजही, पुण्याबाबत माझे हेच म्हणणे आहे. पुण्याला आजमितीस भरपूर भेटी झाल्या, पण अजूनही पुणे शहर “ओळखले” असे म्हणवत नाही!! ही बाब पुण्याबाबत, मग दिल्ली, चंडीगड, बंगलोर, चेन्नई बाबत तर […]

रस्टनबर्ग मधील १ वर्ष!!

रस्टनबर्ग मधील नोकरी ध्यानीमनी नसताना, हाताशी आली, म्हणजे इथे मी इंटरव्ह्यूसाठी २००४ साली आलो होतो पण पगाराबाबत आणि तेंव्हा ती कंपनीच्या Expansion Programme मध्ये प्रॉब्लेम्स आल्याने सगळेच रहित झाले आणि माझ्या डोक्यातून तो विचार निघून गेला होता. परत पीटरमेरीत्झबर्ग या शहरात सुखनैव (??) आयुष्य सुरु झाले होते. २००५ मधील, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ( वास्तविक या काळात […]

सन सिटी – रस्टनबर्ग

२००४ साली, मला अचानक रस्टनबर्ग इथे नोकरी चालून आली. वास्तविक, पीटरमेरीत्झबर्ग इथे तसा स्थिरावलो होतो पण नवीन नोकरी आणि नवीन शहर, याचे आकर्षण वाटले. खरे तर २००३ मध्ये इथे माझा इंटरव्ह्यू देखील झाला होता पण, तेंव्हा काही जमले नाही. मनातून, या गावाचा विचार काढून टाकला होता पण, एके संध्याकाळी, त्यांचा फोन आला आणि दोन दिवसांत सगळे नक्की […]

पीटरमेरीत्झबर्ग

१९९३ च्या अखेरीस, मी नायजेरियाहून परत मुंबई इथे आलो. परदेशी नोकरी करण्याची जरी हौस फिटली नसली तरी अनुभव मात्र भरपूर पदरी जमा झाला होता. ध्यानीमनी नसताना, त्यावेळी मला Hongkong इथल्या नोकरीसाठी बोलावणे आले आणि मी निवडला गेलो. या शहराविषयी तशी बरीच माहिती होती आणि मी जायला उत्सुक देखील होतो. निवड पक्की झाली आणि तिसऱ्या दिवशी मला, साउथ […]

महिंद्र साउथ आफ्रिका

UB group मधील नोकरीचे “बारा” वाजायला लागल्यावर, नवी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. वास्तविक, या नोकरीत स्थिरस्थावर व्हायची इच्छा होती पण प्रारब्ध वेगळेच होते. Standerton हे गाव, म्हणावे अशा अटकर बांध्याचे आहे. आजूबाजूला कुठलेच शहर नजरेच्या टप्प्यात नाही. जुन, जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी असल्याने, लोकवस्ती तशी विरळ!! सुदैवाने, माझ्याच ओळखीत, जोहान्सबर्ग इथे एका कंपनीत, नोकरी संदर्भात […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..