आजही फोटोग्राफीचं हे विश्व म्हणजे छंद जोपासणाऱ्या लोकांसाठी फार आकर्षक … यात त्यांचे पंचप्राण गुंतलेले. फोटोग्राफीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यक्त होण्याचे आयाम कमालीचे उंच झाले आहेत … अलिबाबाची ही पार अनंत काळाला व्यापणारी जादुई गुहा आहे. काय करत नाही कॅमेरा …. सगळं सगळं करतो … कमालीच्या गोष्टी करतो . […]
सांगलीत अभियांत्रिकी शिक्षणासाठी चार वर्षे होतो,पण रंगभूमी दिनाबद्दल (५ नोव्हेंबर) काहीच माहिती नव्हते.कदाचित तो त्यानंतर साजरा करायला सुरुवात झाली असावी. […]
मनस्वी वृत्तीची माणसे स्वप्नांचे पाठलाग सहसा सोडत नाही. ठरविलेल्या प्रघातांची, परिघांची चाकोरी सोडत नाही आणि बघता-बघता एका उंचीवर पोहोचतात. आपल्यालाही त्यांच्यात सामील करून घेतात. अशांच्या समूहात मग स्वतःलाच उत्साही वाटायला सुरुवात होते, त्यांच्या आदरातिथ्याने भारावयाला होते आणि त्यांच्या सहवासानंतर अतृप्ती घेऊन परतावे लागते. […]
आमच्या कडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताईंच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला परवा गेले होते. खूप वर्षांनी त्यांच्या घरात शुभ कार्य होणार होतं याचा एकूण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. […]
भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर ! […]
मार्च २३- माझे रायपूरला “मराठी भाषेचा नाटयप्रवास ” या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते – महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे. […]
” आजचा दिवस माझा ” ! चंद्रकांत कुळकर्णीने दिग्दर्शीय हाताचा परीस या कथेवर मनसोक्त फिरवला आहे. ही तर एका रात्रीची कथा ! पण सुरुवातीला “सिंहासन “जवळ जाणारा हा चित्रपट एकाएकी एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतो. चवीला राजकारण जरूर आहे पण ही एका मुख्यमंत्र्याच्या “आतील ” मानवाचे हृद्य दर्शन घडविणारे कथानक आहे. […]
खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे . […]