नवीन लेखन...

दिवसभरात आपल्या मनात येणारे अनेक विचार.. त्या विचारांना कागदावर.. नव्हे.. संगणकाच्या पडद्यावर उमटवणारे हे सदर

स्वार्थ..

कोणी कितीही काही म्हटलं तरी कोणत्याही नात्यात स्वार्थ हा असतोच. स्वार्थाशिवाय नातं अशक्य आहे. नाती जुळण्याची सुरुवातच मुळी स्वार्थातून होते व अशा एकदा जुळलेल्या नात्यांवर पुढे वेगवेगळे रंग चढत जातात आणि मग पुढं कधीतरी निरपेक्ष नातं तयार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातल्या त्यात एका नात्याला स्वार्थ स्पर्श करत नाही असं म्हणता येईल आणि ते म्हणजे आई […]

हाॅटेलिंग आणि मला न प(च)टलेल्या खाण्याच्या माॅडर्न पद्धती

ग्लोबलायझेशनमुळे मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला व सहाजिकच त्या पैशाला खर्च करण्याचेही मार्गही निघू लागले. माझ्या पिढीचा बचतीकडे असणारा कल, नविन पिढीत खर्च करून उपभोग घेण्याकडे वळू लागला. पैसे साठवण्यासाठी नसून खर्च करणासाठी असतात ह्या विचाराने आता चांगलंच मुळ धरलंय. पैसे खर्च करायच्या नविन मार्गात हाॅटेलिंग हा चवदार प्रकार हल्ली भलताच लोकप्रिय आहे. हल्ली नवरा […]

भुमिकांची अदलाबदल

आपलं म्हणणं जर एखाद्या व्यक्तीला पटलं नाही तर आपण किती सहजपणे तो मुर्ख आहे किंवा त्याला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होतो. पण आपल्या विरूद्ध मतं मांडणाऱ्याची भुमिकाही बरोबर असू शकते हा विचार भले भले करू शकत नाही. समोरच्या माणसाची भुमिका समजून घेण्यासाठी थोडासा परकाया प्रवेशाचं कौशल्य अंगी असावं लागतं आणि ते प्रयत्नाने सहज साध्य […]

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

गुरूवार दिनांक १३ एप्रिल २०१७ हा दिवस बोरिवलीकरांच्या, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या, कायमचा स्मरणात राहील. या दिवशी या वर्षातल्या सर्वात देखण्या आणि भारदस्त कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचा योग बोरिवलीकरांना आला. कार्यक्रम होता बोरिवलीच्या ‘जनसेवा केंद्रा’ने आयोजित केलेला जगद्विख्यात सिद्धहस्त चित्रकार श्री. वासुदेव कामत यांच्या सत्काराचा आणि तो ही साक्षात परमपुजनीय सरसंघचालक डाॅ. मोहनराव भागवतांच्या […]

डॉक्टर  नावाच्या देवांनो…….!

एका दु:खी बापाचे काय सांगू गाऱ्हाणे…..! काळाने उलटा डाव टाकला होता हसतं खेळतं बाळ अंथरुणाला खिळलं होतं. एक दिवशी काळ उगवला अन बाबूचा बबन्या देवाघरी गेला. डेंग्यूने एक बळी घेतला होता. बाबु हतबल झाला. तीळ तीळ तुटला. बाबु होता कणखर तरीही वाहत होती डोळ्यातून आसवांची खळखळ…! एखादे फुल उमलण्याच्या आधीच नष्ट झाले. त्या मात्या- पित्यावर झालेला […]

जन्म परतफेडीसाठी

वपु काळे यांच्या एका पुस्तकातील हा उतारा. वाचा आणि विचार करा.. “आपण हा जो जन्म घेतला आहे, तो अपेक्षापूर्तींसाठी नाही. आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात, असं नाही. आपल्या स्वत:कडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात फक्त जाळणा-या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींसाठी नाही. हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात. ह्याचा अर्थ, कोणत्या तरी जन्माची एक परतफेड […]

दुष्ट, खडूस आई…

“आई, तू खूप मीन (खडूस) आहेस.” हे शब्दजेव्हा पहिल्यांदा माझ्या लेकीच्या तोंडून ऐकले,तेव्हा खूप वाईट वाटलं. खरंच मी खडूस, दुष्ट आहे?माझी स्वतःबद्दल ‘अतिशय प्रेमळ व इतरांना त्रास नहोऊ देणारी व्यक्ती‘ अशी प्रतिमा होती! त्यामुळे हेविशेषण ऐकून जरा धक्का बसला. पण जसजसे हेवारंवार ऐकू येऊ लागले तसतसे, तो अपमान नसूनप्रसंसा आहे, असे मी स्वतःला सांगू लागले. कारणप्रत्येक […]

मन कि बात – जयहिन्द

माझी पत्नी जिथे नोकरी करते, तिथल्या रोजच्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करत असते. ती सांगत असलेल्या सर्वच गोष्टींकडे माझं लक्ष असतंच असं नाही परंतू काही वेगळ्या गोष्टी मात्र कान आणि लक्ष वेधून घेतात.हल्ली तिच्या बोलण्यात ‘जयहिन्द’ हा शब्द वारंवार येऊ लागलंय ह्याची मी नोंद घेतली व माझं कुतूहल जागृत झालं. कुतुहल जागृत होण्यातं कारण हे, की […]

कुत्र्याची पिलं

लहानपणी आम्ही रस्त्यावरची कुत्र्याची पिलं पाळायचो.. त्यांना राहायला खोक्याची घरं करायचो.. सक्काळ-संध्याकाळ चांगल्या, घरच्या पोळ्या दुध खाऊ-पिउ घालायचो.. आठवड्याला आंघोळ घालायचो.. फक्त बांधून मात्र घालायचो नाई.. आम्हाला वाटायचं ‘वा.. काय छान पाळलय आम्ही ह्यांना.. ही काई रस्त्यावरच्या ईतर कुत्र्यांसारखी नाईयेत’ वगैरे मजा असायची.. पण पुढं मोठी झाल्यावर मात्र हीच पिल्लं,आम्ही केलेल्या घरातून निघुन जात..त्यांच्याच इतर भाईबंदांना शोधुन […]

वैश्विक नातं

आपल्याला मिळालेली नाती हि अनमोल देणगी असते. हि नाती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. […]

1 9 10 11 12 13 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..