काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून मोदींचे सरकार निवडून दिले. त्याच्याही प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजीवी तुटून पडताहेत. आपण खरं म्हणजे खुश राहण्याची आपली क्षमता गमावून बसलोय. आपली सहनशक्ती जवळपास संपत आलीय. एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले – वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बर्याच नेत्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवली नाही. हा व्यक्ती किमान […]
1972 चा दुष्काळ आठवतोय, माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो ! पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती ! रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती. पण […]
तन-मन हलकं होऊन नवनविन अचाट कल्पना सुचायची जगभरात दोनच ठिकाणं. ‘पायखाना’ आणि ‘मयखाना’..! दोन्ही ठिकाणी ‘बसायला’ लागतं.. आणि गम्मत म्हणजे कल्पनांचं जन्मस्थान असणाऱ्या या दोन्ही ठिकाणांचा आपल्या समाजात सभ्य ठिकाणी उच्चार करण असभ्यपणाचं मानलं जातं..! (टीप – पायखानाचा अर्थ स्वत: शोधणे.)
डोंगराच्या कुशीत जन्म घेणारी नदी कुठल्याश्या अनावर ओढिने सागराच्या दिशेने धावत सुटते..दगड-धोंडे, काट्या-कुट्यातून वाट काढत ती सागराकडे झेपावते..डोंगर माहेर तर सागर सासर..सासरी निघालेल्या नदीला माहेराची सय सतत येतं असते आणि एखद्या वळणावर न राहावून नकळत ती माहेराच्या दिशेने वळण घेतै..माहेरी जाण्यासाठी नदी ज्या ठिकाणी वळते ते ठिकाण ‘तिर्थक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध होतं..माहेराचं हे महत्व..! नदी असो की […]
तो निश्चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. पांदीच्या, कच्च्या, वळणी, पाऊलवाटा . डोक्यावर चिंचेचं झाड डेरेदार. चिंचेखाली एक बाल आहे. पसरट मोठा दगड़. त्यावर बसून गारमस्त हवा घ्यायची. […]
त्याला बोलता येत नाही, म्हणून ऐकताही येत नाही. पन्नाशीची उमर आहे. लिहिता येते फक्त नाव. सहीपुरते. खाणाखुणावर चालतो दैनंदिन व्यवहार. प्रपंचाची कसरत करतो. हा आमचा मित्र आठवतो. कारण म्हणजे अलीकडे पाऊस झाला. नदी वाहिली. दुष्काळझळा कमी झाल्या. वेदना कायम असल्या तरी. निसर्गाची कृपा झाली. डोहात पाणी साचले, म्हणून डोकावलो तेथे. भडभडून आले. जुने दिवस आठवले. म्हशी […]
नागपूरला शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते. देशभरातून शेतकरी उपस्थित राहणार होते. चळवळीत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. समूह जमला होता. नागपूरला जायचे होते. तयारी झालेली. कार्यकर्ते तयार होते. किसान कर्जमुक्ती होणार होती. उत्साही वातावरण होते. गावभर चर्चा. कर्जमाफी होणारच. गर्दी वाढत होती. छातीवर बिल्ले लावलेले. औरंगाबाद-मनमाडहून रेल्वेने बसायचे आणि नागपूरला उतरायचे. असे नियोजन. प्रवास सुरू. […]
मला तर सध्यस्थितीत अस वाटत की, प्रत्येक भारतीय मनुष्य “भारतीय दंड संविधानाला” घाबरेल अस वाटतच नाही…. कारण हल्ली कायद्याच्या रक्षणासाठी असलेल्या …. नेमलेल्या….. व्यक्तीच अशा अनेक कायदेशीर पळवाटा शोधुन काढतात की, त्याला सर्वौच्च न्यायालय देखील काहीच करु शकत नाही. पण… मात्र.. भारतातील प्रत्येक जातीधर्मांतील श्रध्दाळु भक्तच मला जास्त आवडतात….. कारण ह्यांची ज्या-त्या देवांपाशी असलेली अपार भक्तीच […]
मी ‘स्त्री’ या विषयाकडे गमतीने परंतू गंभीरपणे बघतो..अनेक वर्षांच्या निरिक्षणातून, वाचनातून ‘स्त्री’विषयी माझं असं एक मत बनलंय.. जगातील कोणत्याही समाजात ‘स्त्री’ जन्मत नाही तर ती ‘घडवली’ जाते.. जन्म घेताना ती कोणत्याही जीवाप्रमाणे सर्वसामान्य जीवाप्रमाणेच असते मात्र तीने एकदा का जन्म घेतला, की मग त्या क्षणापासून तीला ‘स्त्री’ म्हणून घडवण्यासाठी तिच्यावर हातोडा-छिन्नीचे घाव बसायला सुरूवात होते..घर आणि […]