नवीन लेखन...

दिवसभरात आपल्या मनात येणारे अनेक विचार.. त्या विचारांना कागदावर.. नव्हे.. संगणकाच्या पडद्यावर उमटवणारे हे सदर

गरज आहे का याचा प्रथम विचार करा

आयुष्यात ज्या ज्या गोष्टी कराव्यात असे तीव्रतेने वाटते, त्या करताना कसलाही संकोच बाळगू नका.. सिगारेट ओढावीशी वाटली, ओढा.. दारू प्यावीशी वाटते, जरूर प्या.. प्रेमात पडावंस वाटतं, तसा प्रयत्न करा.. इतकंच कशाला, एखाद ‘प्रकरण’ करावंस वाटलं तर तेही करा.. पण…, हे सर्व करताना ‘याची खरोखरच काही गरज आहे का’ याचा प्रथम विचार करा..!! — गणेश साळुंखे

डार्विनचा सिद्धांत माझ्या नजरेतून

डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला.. मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..! कारण, एकूणच मनुष्याचे आचरट वर्तन पाहाता तो मानसीक पातळीवर अद्याप आपल्या पुर्वजांच्याच पातळीवर असावा अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे..!! (आपले राजकीय नेते, अध्यात्मीक ‘बाबा’, मेणबत्ती संप्रदाय आणि दुटप्पी ‘आम आदमी’ म्हणजे आपण सर्व यांच्यामूळे मी प्रसवलेला ‘सिद्धांत’) — गणेश […]

आमचे भाईकाका !

महाराष्ट्राने ज्या लाडक्या व्यक्तिमत्वावर जीव ओवाळून टाकला त्या पु.ल. उर्फ भाईंचा जन्मदिवस येताच मी आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलो. माझं वय होतं अकरा वर्षे. इयत्ता सहावी. एक दिवस आईने माझ्या हातात एक चिटोरा दिला व मला म्हणाली जोग काकांकडे जा आणि त्यांच्याकडे उतरलेल्या पाव्हण्यांची सही घेऊन ये. सही कशाला म्हणतात, ती कशासाठी घ्यायची असते हे न कळण्याच्या […]

नेपाळी मित्राचा सहवास

त्याची मातृभाषा नेपाळी. तो नेपाळहून महाराष्ट्रात येतो. आई देवाघरी गेलेली. वडील गुरखा म्हणून रात्रभर जागत. गावात पहारा देत. लोकांना जागवत. एक भाऊ पाठीशी. तो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेतो. गावातील व्यापारी , शिक्षक त्यांना मदत करतात. माणुसकी जपतात. मराठी भाषा उत्तम बोलतो. पुढे तो इंजिनीयर होतो. पुण्यामध्ये स्वत:चे वर्कशॉप चालवतो. जगण्यासाठी धडपड करतो. आता ते दोघेही […]

सोयाबिन

शहरात राहणार्‍यांनी सोयाबिन हे नाव ऐकल आहे का? नाही.. बरं सोया हे तेलाचे नाव ऐकल का? आता उत्तर हो येईल. मी एक पोलीस आहे आज घरून नीघालो एक फोन आला खामगाव Market जवळ खुप गाड्यांची गर्दी जमा झाली असुन संपुर्ण रस्ता बंद झाला आहे .मी आणी माझे सहकारी पोचलो तर 300/400 छोट्या मोठ्या गाड्या market समोर […]

आस्तित्व

जगण्या-मरण्याच्या पोकळीमध्ये जे दोन-चार क्षण आपल्या वाटयाला येतात त्याला आपण आयुष्य असं म्हणत असतो. पण कधी-कधी या आयुष्याची निरर्थकता स्पष्टपणे जाणवायला लागते. ‘We are thrown into the world’ या हायडेगरच्या वाक्याची सार्थकता जाणवायला लागते. कशासाठी खेळायचा हा खेळ? कशासाठी जगायचं? आई-वडिलांसाठी? बायकोसाठी? मुलांसाठी? देशासाठी? समाजासाठी? पण आई-वडिलांनी तरी का जगावं? मुलाने तरी का जगावे? देश तरी […]

विचार करा – फटाके फोडणे

वाचा व विचार करा… फटाक्यातील विषारी वायूमुळे, धुरामुळे  दमा , खोकला , डोकेदुखी , त्वचारोग , ब्लडप्रेशर तर कधी कँन्सरही होऊ शकतो . फटाक्यांच्या आवाजाची पातळी ’80’ डेसिबल पेक्षा जास्त वाढली तर माणसाला ञास होतो . बहुतेक फटाक्यांच्या आवाजाची पातळी 100 डेसिबल पेक्षा जास्त असते . बॉम सारख्या फटाक्यांचा आवाज लहान मुलांच्या उरात धडकी तर वृद्धांची व आजारी व्यक्तिंची […]

अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता

अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता त्याने काही दिले नाही दिले , तरी आपल्याला फुकटचा वास घेता येतो वा मिळतो. चांगल्या लोकांचा सहवास त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. त्यानं काही दिलं नाही, बोलला नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी त्याच्या देहातून-मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदनं बाहेर पडतात त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं […]

सळसळता पदन्यास कायमचा थबकला !

२३ तारखेला सासवडजवळील एका गावात माझ्या कार्यक्रमासाठी पुण्यातून बाहेर पडताना टिळक स्मारक मंदिराकडे बघायचं नाही असं अगदी निक्षून मनाला बजावलं होतं. पण स्वारगेटच्या दिशेने जाताना टिळक स्मारकच्या प्रवेशद्वारासमोर ड्रायव्हरला एक क्षण गाडी थांबवायला सांगितलेच. अवघ्या काही तासांपूर्वीचा भरत नाट्य मंदिरातील सळसळता पदन्यास नाट्य परिषदेच्या कार्यालयासमोर निपचित पडलेला बघणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडली गोष्ट होती. दुरूनच तिला हात […]

1 15 16 17 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..