२)प्रत्येकाला परमेश्वराने जन्म देताना आपआपला तळहात नि तेवढाच पसा दिला आहे.ज्याच्या त्याच्या ओंजळीत मावेल इतकंच पाणी त्याला पिता येतं.हव्यासापोटी कुणी कितीही ओरबाडून घागरभर पाणी पदरात पडून घेतलं,तरी पसाभर सोडून बाकी सारं वाहून जातं.अखेर जाताना तेवढा पसाभरही काही न्यायचा परवाना नाही ………या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर आपल्याला आपलं नाव का बरं कोरता येऊ नये—–सतत काहीतरी मागणं मागत राहायचं […]
१)आयुष्यातील सगळी गणितं निव्वळ बेरीज,वजाबाकी,गुणाकार आणि भागाकार यांच्या मदतीने सुटत नाहीत वा उत्तराबद्दल ठाम भाकीत करता येत नाही.या गणिताचं संपूर्ण ज्ञान आणि भरपूर सराव काही हमखास उत्तरं मिळवण्याचा मार्ग नव्हे.शेवटी नियतीनं तिच्यापाशी राखून ठेवलेला एक हाच्चा सगळी गणितं सोडवीत असतो . आणि याच हाच्च्याचा ज्याला अर्थ कळला त्याला आयुष्यभर गणिताची भीती उरत नाही.— गणित हा सरावाचा […]
आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही […]
‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते. […]
वाळकेश्वरच्या सुप्रसिद्ध रस्त्यावरील ‘तीन बत्ती’ तिठ्यापाशी वाळकेश्वर या ऐतिहासिक परिसराची माहिती देणारा एक स्टीलचा फलक एका खाजगी संस्थेने लावलेला आहे. या फलकावरील मराठी भाषेतील माहिती, माननीय राज्यपालांचे जन संपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. या पाटीवरील लिखाणासाठी माझं नांव त्या पाटीवरील माहितीखाली लिहून मला श्रेयही देण्यात आलं आहे. श्री. उमेश काशिकरांच्या या औदार्याबद्दल मी त्यांचा आणि त्या संस्थेचा आभारी आहे..! दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची अहमिहीका लागलेल्या आजच्या दिवसांत असं औदार्य दुर्मिळ आहे आणि म्हणून त्याची किंमत मोठी आहे.. […]
… आणि या प्रवासातला माझा सोबती… माझ्या गत तिनेक वर्षातल्या लेखनप्रवासात मला ज्याने न थकता अखंड आणि अबोल साथ दिली, त्याही त्याच्या तिन पिढ्या, त्या माझ्या सोबत्याचा, माझ्या मोबाईलचा, उल्लेख केला नाही तर ते कृतघ्नपणाचं ठरेल. […]
सोशल माध्यमातील जग खोटं असतं असं म्हणतात. पण मला वाटतं सोशल मिडीयावर आपण कसं वागतो, त्याप्रमाणे आपल्याला तेथील जग भेटतं. आज भेटलेलो आम्ही सोशल मिडीयावर भेटलो. एकमेकांच्या कामाची, तळमळीची खुण आम्हाला सोशल मिडीयावरच पटली. नाहीतरी प्रत्यऱ्क्षात भेटणारी माणसं का कमी खोटं वागतात..? पण हेतू आणि नियत शुद्ध असेल तर मग या जगात खोटं, आभासी असं काहीच नसतं असं मी समजतो. हेतू-नियत साफ असेल तर जे खोटं आहे, ते ही शुद्ध-पवित्र होऊनच समोर येतं..मनाच्या शुद्ध असण्यात प्रचंड ताकद असते, हे मी आज अनुभवलं.. […]
एका अनपढ ट्रक ड्रायव्हरच्या ट्रकवरच्या या वाक्याला आपल्या देशाचं ब्रिदवाक्य म्हणून मान्यता द्यायला हरकत नाही..! जनतेची व देशाची फिकीर तुम्हा-आम्हाला. या भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांना तर आपल्या भावी पिढ्यांची फिकीर पडलीय.. मग तुमच्या आमच्या कितीही पिढ्या बरबाद झाल्या किंवा ढेकणासारख्या चिरडून मेल्या किंवा वांग्यासारख्या खरपूस भाजून मेल्या तरी चालतील..!! […]
सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते वेळीच शहाणे झाले नाहीत तर त्यांचं, त्यांच्या पक्षाचं आणि पर्यायाने भारतातील लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय व्यवस्थेचं भवितव्य अवघड होईल यात मला तरी शंका नाही..! […]
मुंबई शहरात विविध ठिकाणी दिसत असलेला हा संदेश नेमका कसला आहे आणि तो कोणी लिहिला आहे हे शोधून काढण हे तपास यंत्रणांच काम आहे व ते ते करतही असतील असं मी समजतो. याकडे आपलं लक्ष वेधून घेणं मला आवश्यक वाटलं, म्हणून हा लेखन प्रपंच. […]