आदरणीय बाबासाहेब.. तुम्ही आयुष्यातील पहिले कर्ज पुस्तकांसाठी घेतले होते, असे एकदा कानावर आले होते. ते आम्हीही जयंती मयंतीला सांगतो. अगदी टाळ्यांच्या कडकडाटात !! पण चुकून कधीही पुस्तकाला हात लावित नाहीत. मला सांगा, पुस्तकांनी कुठे पोट भरते का? इतर पुस्तकांचं जाऊ दे तुमच्या दक्ष निगराणीखाली तयार झालेली भारताची राज्यघटना तरी उठ-सुट तुमचं नांव घेणाऱ्या किती जणांच्या घरी […]
मी कायद्याचा जाणकार नाही. परंतू जे नजरेला दिसलं, त्यावरून मला हे लिहावसं वाटलं. माणसं, माणसं असताना कायदा गाढव होता हे ठिक आहे. पण आता माणसं गाढवासारखी वागू लागल्यावर, कायद्याने आता माणसासारखं वागायला हरकत नसावी, एवढंच मला सुचवायचं आहे..!! […]
कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथंम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत एवढ्या त्या एकरुप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतू स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. माझे मालवणीतून अर्थवाही कविता करणारे मालवण स्थित कविमित्र श्री. विनय सौदागर यांनी […]
पत्त्यांचे अनेक खेळ आहेत त्यात, रमी हा खेळ आपल्या जीवनाशी बराचसा निगडित आहे, म्हणून तो मला बाकीच्या पत्यांच्या खेळापेक्षा थोडा हटके वाटतो. या खेळात जीवनाची अनेक सूत्रे सापडतात. प्रत्येक खेळाडू यात पत्ते वाटतो….त्याला ते वाटावेच लागतात, याचा अर्थ त्याला जीवनाच्या सारीपाटात सूट नाही. जर हा खेळ पुढे सुरू ठेवायचा असेल तर, स्वतःची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावीच लागते. […]
सन २०१०च्या जानेवारीत बाळासाहेबांसोबत भेटीचा योग आला होता..हा फोटो त्या भेटीच्या वेळचा आहे. अर्थात मी बाळासाहेबांच्या भेट मागितली आणि ती मिळाली, अस काही घडायला मी काही मोठा नव्हतो. मी तर त्यांचा साधा शिवसैनिकही नव्हतो. परंतु काही गोष्टी घडण्यासाठी आपलं नशीब लागतं आणि ते नशिब फळण्यासाठी योगही यावा लागतो. तसंच काहीसं या भेटीबाबत घडल. […]
मन कि बात.. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभं राहाण्याची गरज नसल्याचा निर्वाळा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. असा निर्वाळा देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१६ साली चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करण्याविषयी स्वत:च दिलेल्या निर्णयातील शब्दरचना बदलण्याची तयारीही दर्शवली. दि. १ डिसेंबर २०१६ साली सर्वोच्च न्यायालयानेच देशातील सर्व चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जावे व त्याप्रसंगी यर्व उपस्थितांनी उभं राहायला […]
पूर्वी वडिलांच्या अंगावरील जुने कपडे पाहून, मी त्यांना कित्येकदा “ओरडलो” असेल कि, नवीन कपडे शिवून घ्या, फाटेपर्यंत घालायचे असतात का ? पण ते “हो” म्हणून वेळ मारून नेत असतं… तसा दिवाळीचा आणि आपला काही संबंध नाही पण, “स्त्रीहट्ट” आणि “बालहट्ट” सांभाळून घेताना, कोणाला कपडे, कोणाला मोबाईल… वगैरे वगैरे अशी खूप मोठी प्लांनिग केली, अचानक लक्षात आले “स्वत:साठी” काहीच ठरवले […]
वारंवार कोसळू पाहाणाऱ्या लोकशाहीच्या सर्कशीच्या तंबूची शेवटची मदार आता न्यायववस्थेच्या चौथ्या खांबावरच आहे. या खाबाचं काही आलवेल नसलं, तरी तो अजून इतर तिन खांबांयेवढा पूर्ण सडलेला नाही, हे दाखवून देण्याची हिच वेळ आहे..!! […]
आपल्याकडे गेली अनेक वर्षे विकास या शब्दाची चर्चा आहे. हल्ली तर विकास सुसाट सुटलाय ते विकास वेडा झालाय इथपर्यंत चर्चा आहे. देशातील इतर शहरांचं माहित नाही, परंतू मुंबई गेली काही वर्ष ‘विकास’ चाललेला ‘दिसतो’ आहे. विकास हा शब्द नेत्यांपासून ते एखाद्या कंगाल माणसापर्यंत सर्वच लोकांच्या मुखात असतो. परंतू प्रत्येकाच्या विकासाची व्याख्या मात्र वेगवेगळी आहे असं वाटतं. हे म्हणजे विकासाच्या रथाला चहूबाजूने घोडे, ते ही शहरातलं धष्टपुष्ट अरबी ते गांवाकडचं एखादं मरतुकडं घोडं, अशा वेगवेगळ्या ताकदीचे जोडले आणि त्यांना त्यावरील, पोट भरलेला नेता ते पोटभरू कामगार अशा, स्वारांनी एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेने जोरात पळण्यासाठी टांच मारली, तर त्या विकासाच्या रथाचं जे काही होईल, तसं आपल्या विकासाचं झालंय असं मला वाटतं..हे असं होण्याचं एकमेंव कारण म्हणजे विकासाची नेमकी व्याख्या काय आणि तो कोणासाठी करायचा हे ठरलेलं नसणं. […]