बिघडलेल्या आठवणी
स्मरणाशी संबंधित सर्व बिघाड गंभीर नसतात. ‘गाड्यांच्या गर्दीत आपण कार कुठे पार्क केली ते आठवत नाही’ ही काही मोठी बाब नाही, पण आपण पार्किंग लॉटमधे कसे आलो हे आठवत नसेल तर ती गंभीर समस्या असते. आपल्याला एखादी गोष्ट आठवली नाही वा चुकीची आठवली तर आपण कावतो, कधी अपराधी वाटतं, तर कधी खजिल व्हावयास होतं. असा अनुभव सर्वांना येत असतो आणि वयाच्या सर्व टप्प्यांमधे येतो. […]