विज्ञान आणि अध्यात्म ः युगान्तरे.
या पृथ्वीवरील पर्यावरण प्रवाही आहे. ठराविक कालखंडाला युग ासे म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगे आपल्या परिचयाची आहेत. मी त्यात आणखी तीन युगांची भर घहालीत आहे. […]
या पृथ्वीवरील पर्यावरण प्रवाही आहे. ठराविक कालखंडाला युग ासे म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगे आपल्या परिचयाची आहेत. मी त्यात आणखी तीन युगांची भर घहालीत आहे. […]
डार्विनच्या अुत्क्रांतीवादाने बर्याच धार्मिक संकल्पनांना धक्का दिला. आनुवंशिक तत्वाच्या (जेनेटिक मटेरियल) अुत्क्रांतीमय बदलांमुळे सजीवांच्या प्रजाती निर्माण होतात हे सिध्द झाले. आनुवंशिक तत्वच शरीर धारण करू शकते म्हणजे आनुवंशिक तत्वच सजीवांचा आत्मा असला पहिजे. या तत्वानुसार मी आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मांडला आहे.
[…]
आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स…जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे. सजीवाच्या प्रत्येक पेशीत, आनुवंशिक तत्व, जेनेटिक मटेरियल असते आणि तोच पेशीचा आत्मा. सजीवांचा आत्मा प्रत्येक पेशीत म्हणजे सर्व शरीरातच असतो.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions