लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. […]
शेतकरी केंद्रिबदू मानून बाजार समित्यांची रचना करण्यात आली. मात्र, ह्या समित्या आज राजकारणाचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे जरुरीचे म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेली इ -नाम प्रणाली बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरु शकेल काय? हा एक चिंतनीय प्रश्न आहे. […]
लग्नासारखे पवित्र संस्काररूपी बंधन झुगारून कित्येक संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. लग्न टिकविण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही के मग घटस्फोटासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु होते. […]
दिनांक १४ ऑगस्ट २०१७ ला दैनिक प्रत्यक्षच्या राष्ट्रगंगेच्या तीरावर मधील सिद्धार्थ नाईक यांचा ‘हरेकाला हजब्बा यांची शाळा’ आणि निशिगंधा खांबे यांनी लिहिलेला लष्करी शिस्तीचे ‘अटूस’ हे दोन्ही लेख खूप आवडले. […]
कुठल्याही कार्यालयात मग ते सरकारी असो की खाजगी असो कामाच्या वेळात काम हे केलेच पाहिजे म्हणजे ज्याचा आपण काम करून मोबदला घेतो तो चोख आणि प्रामाणिकपणे करणे आपले कर्तव्य आहे. पण काही वेळा स्मार्टफोनमुळे कामात टंगळमंगळ केली जाते मोबाईल वरील मेसेज वाचण्यात आणि ते पुढे पाठविण्यात आणि च्याटींग करण्यात बराचसा वेळ फुकट जातो पण हे कर्मचार्यांच्या लक्षात येत नाही आणि जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांना नाईलाजाने लक्षवेधी सुचनेसारखे नियम आस्थापनांत लागू करावे लागतात हा नियम कर्मचार्यांसकट जनतेसाठीही लागू होतो आणि मग दोघांचीही मने शासन, अस्थापन आणि अधिकार्यांप्रती दुषित होतात. […]
परवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे आहेत. लांडग्यांचा कळप… एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन […]
ऊस हे नगदी पीक आहे. ते पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पश्चिम महाराष्ट्रात भरपूर ऊस होतो. तर मराठवाड्यात कमी पर्जन्यमान असल्याने येथील शेतकरी, शेतमजूर ऊसतोडीचा पर्याय निवडतो. दिवाळी – दसरा सणादरम्यान बहुतांश साखर कारखाने सुरू होतात. हंगाम सुरू होण्यासाठी बैलगाडी,ट्रॅक्टर, ट्रक यांचा वापर ऊस वाहतुक करण्यासाठी केला जातो. ऊसतोडीस मजूर लागतात. त्यांना उचल, आगावू रक्कम दिली जाते. […]
अमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे. […]
देशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे. रामणवाडी (ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या गावात ८० देशी गाई आहेत. […]