नवीन लेखन...

सहकार, सहकारी संस्था, सहकारी चळवळ याविषयी लेखन

३३,६०० सहकारी संस्था आणि कर्मचारी फक्त २५० !

२१ वॉर्ड ऑफिस, चार जिल्हा उपनिबंधक कार्यालये, एक विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि त्यामध्ये नोंदणी झालेल्या ३३६०० सहकारी संस्था. या संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी शासकीय यंत्रणा म्हणजे सहकार खात्याचा मुंबई विभाग. त्यांच्याकडे कर्मचारी अवघे २५०!
[…]

सहकारी तत्वावरील मासेमारी

महाड जिल्ह्यातील रायगड येथील आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नदीतील मासेमारी. पण नद्यांवर धरणं बांधली गेल्याने तेथील मच्छीमारीवर मर्यादा आल्या. पोटापाण्यासाठी आदिवासी स्थलांतर करू लागला. २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्या वेळी कोयनानगर सातारा येथील श्रमजीवी संघटना त्यांच्या मदतीला धावली. मच्छीमारीतून त्यांना उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबत त्यांनी विचार सुरू केला. पूर्वी दोन आदिवासी […]

प्रवास ९७ व्या घटना दुरुस्तीचा

महाराष्ट्र राज्याच्या अन् पर्यायाने देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासातील सहकार क्षेत्राचे महत्व ओळखून, सहकार चळवळीच्या निकोप वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याचा विचार गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. १९०४ मध्ये सर्वप्रथम भारतात सहकार कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर अनेकवेळा कायद्यात बदल झाले. १९०४ नंतर १९१२ मध्ये को-ऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट अस्तित्वात आला. या पार्श्वभूमीवर नुकतेच संसदेने सहकारविषयक १११ वी घटना […]

उपेक्षा ईश्यानेकडील राज्यांची !

आर्मस्ट्राँग हा मणिपूरच्या टॅमेंग्लाँग या दुर्गम गावातील झेमे या आदिवासी जमातीत जन्मलेला मुलगा. या दुर्गम भागातील आणि जमातीतील भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) परीक्षा पास झालेला पहिलाच अधिकारी. रस्त्यांचे आणि इतर पायाभूत सुविधांचे कमालीचे दुर्भिक्ष असलेल्या या राज्यात त्याने सरकारची वाट न पाहता स्वत: पुढाकार घेऊन जवळ जवळ १०० किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यास सुरुवात केली.
[…]

पेढांब्यात सामुहिक शेतीचा यशस्वी प्रयोग !

सर्वांनी मिळून २००६ मध्ये ‘श्री सत्यनारायण केळी प्रकल्प’ हाती घेतला. ५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्याचा निश्चय करण्यात आला. त्यापैकी ३० एकर या शेतकऱ्यांच्या मालकिची तर २० एकर मुंबईला राहणाऱ्या नातेवाईकांकडून भाडेपट्टयावर घेतलेली होती. ही सर्व जमीन पडीक स्वरूपाची होती. प्रारंभी शेतीच्या यशाविषयी अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या.
[…]

इलेक्ट्रिकल इंजिनिअरची दुग्धव्यवसायात क्रांती!

नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने बेसखेडा जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्री रवी पाटील या होतकरु तरुणाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘चॅलेंज’ म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे.
[…]

महिला बचतगटांनी उचलला ग्रामविकासाचा भार

स्त्री ही अबला व व्यवहारशून्य असते अशी मानसिकता मोडीत काढून ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या सदस्यांनी या मानसिकतेला जबरदस्त तडाखा देत नवऱ्याचे सर्व व्यवहार सांभाळल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
[…]

परदेशात जातेय येलदरीची कोळंबी

परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिध्देश्वर जलाशयातील कोळंबी (झिंगा) आणि कतला, मरळ या माशांना चीन व जपानमधून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी येलदरीच्या गोडय़ा पाण्यातील कोळंबीची हवाबंद डब्यातून चीन व जपानला निर्यात झाली. रोज सुमारे ३० क्विंटल कोळंबी पाठविली गेली. या कोळंबीला ९०० ते ११०० रुपये किलो भाव मिळाला. पूर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीने चीनबरोबरच जपानलाही कोळंबीची निर्यात केली आहे.
[…]

सहकारातही हवा माहिती अधिकार

माहिती-अधिकाराच्या कायद्यामुळे विविध क्षेत्रातील गैरव्यवहार, फसवणूक आदींवर अंकुश ठेवण्यात यश येत आहे. पण, या कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने सहकार क्षेत्रातील वाढत्या गैरव्यवहारांना आवर घालणे कठीण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्र माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याबाबत विचार करावा ही मुंबई उच्च न्यायालयाने केलेली सूचना महत्त्वाची मानायला हवी.
[…]

साखरशाळांचे भवितव्य टांगणीला

विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्‍या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
[…]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..