विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. […]
आज अनेक कारणांमुळे पृथ्वी वरील पर्यावरणाचा तोल ढासळू लागला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वच स्तरांवर होत आहे. या दृष्टीकोनातून जगात सर्वत्र प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड व पुणे शहरात शासनाने प्लास्टिक वर बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचा लाभ अनिरुध्द बचत गटाच्या महिलांनी घेतला. बाजारात प्लॉस्टिक पिशव्यावर बंदी असल्याने ग्राहकांना कापडी पिशव्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. हा दृष्य विचार करुन या महिला काम करीत आहेत. […]
सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात मोडणारा जव्हार तालुका. या तालुक्यात आदिवासींची संख्या ही अधिक आहे. दर्या-डोंगर, झाडे झुडपांनी बनलेल्या या जव्हार तालुक्यातील दुर्गम भागात खडतर जीवन जगणार्या महिलांनी मेहनत व जिद्दीने बचत गटाच्या माध्यमातून गुणकारी औषध निर्मिती करून नावलौकिक मिळविला आहे. […]
लोणची, पापड, खाद्य पदार्थ यामध्येच आतापर्यंत बचत गट अडकले होते. परंतु काहीतरी नवीन करावे, ही चाकोरी बदलावी या उद्देशानेही काही बचत गट कार्यरत आहेत. […]