चहाची गाथा
चहा म्हणजे ना, आपला वीक पॉईंट. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहा लागतो असं नाही म्हणता येणार, कारण परदेशातील लोकांप्रमाणे रात्री जेवणानंतर चहा पिण्याची फॅशन अजून तरी आपण स्वीकारलेली नाही. पण चहाचं नाव जरी काढलं ना तरी चहाचा एक तरी घोट पोटात जावा म्हणून आपण धडपडू लागतो आणि तो ग्रहण केल्यावर अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं. चहा मिळाली नाही तर आपण किती अस्वस्थ होतो, नाही का? सकाळी उठल्यावर अंघोळ नाही करता आली तर चालेल, पण चहा पाहिजे. […]