वैकुंठ चतुर्दशी
कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी हरि-हरांचे (विष्णू-शिव) यांचे पूजन करण्यास सांगितले आहे. सामान्यतः शिव पूजनासाठी निशिथ काळ श्रेष्ठ असतो. परंतु या दिवशी निशिथ कालात विष्णूंची पूजा करून अरूणोदयी शिवांची पूजा करण्यास सांगितले आहे. […]