श्री क्षेत्र नरसोबावाडी महात्म्य
नरसोबावाडी ही साधु-संतांची तपोभूमि आहे. श्रीराम चंद्रयोगी तेथे राहिले होते. नंतर नारायणस्वामी आले. काशीकर स्वामी, गोपाळस्वामी तेथेच राहिले. येथे प्रसिद्ध मौनीस्वामी सिद्धपुरुष होऊन गेले. ब्रह्मानंद स्वामी, गोविंदस्वामी येथे रहात असत प.पू. श्रीटेंबेमहाराज येथे वरचेवर येत होते. योगी वामनराव गुळवणी महाराज दर गुरुद्वादशी वारी करीत असत. […]