नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

मूर्तीपूजा : विविध धर्मातील फरकाचा एक मुद्दा !

मूर्तीपूजा ही पंचेद्रियांवर अवलबून असलेल्या माणसाच्या आकलनशक्तीची अगतिकता आहे. मूर्तिपूजक आणि मूर्तिभंजक या दोघांनीही जर हे सत्य समजावून घेतले तर दोघेही त्या विश्वनिर्मात्याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने करतानाही परस्परबंधुभाव सांभाळू शकतील. एवढेच नव्हे तर तो वृद्धिंगतही करू शकतील. […]

गायत्री मंत्र संपादन (नवीन गायत्री मंत्रांसह)

गायत्री मंत्रांबद्धल अनेक लोकांना कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेक लोकांना ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं’ ही सविता गायत्री म्हणजे सूर्य गायत्री माहिती असते. मूळ सूर्य गायत्री मंत्राशिवाय पण अशा खूप गायत्र्या आहेत. त्या या लेखात संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. गायत्र्या वेगवेगळ्या देवतांच्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही. […]

अगत्य

आमच्या कडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताईंच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला परवा गेले होते. खूप वर्षांनी त्यांच्या घरात शुभ कार्य होणार होतं याचा एकूण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. […]

परशुराम जयंती

हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता. […]

खटकणारी आडनावं बदलण्याचे काही अुपाय

कुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं. काही आडनावं भारदस्त असतात तर काही लाजिरवाणी असतात. […]

अधिष्ठाता विठ्ठल

आषाढीचा मुहूर्त गाठत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या वाटेवर पडत आहेत. भक्तांच्या गर्दीत त्यांना विठोबाचं दर्शन होणार नाही, कदाचित…पण त्यांना लांबून दिसणारा विठ्ठलमंदिराचा कळसही पुरतो दर्शनासाठी…कारण त्यांचा विठ्ठल, त्यांच्या हृदयातच तर वसतो! […]

जाऊ तेथे वारी

सामाजिक अभिसरणाचं उत्तम माध्यम असलेली ‘वारी’ हा मानवी संस्कृतीचा एक स्थायीभाव आहे. आपल्याकडे पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण दरवर्षी ठरल्या वेळी धार्मिक स्थळांना भेट देण्याची अशी परंपरा जगात ७-८ हजार वर्षांपासून सुरू आहे…  […]

पंढरिये माझे माहेर साजणी

पंढरीच्या वारीत एकाचवेळी संतपरंपरा आणि लोकपरंपरा गुण्या-गोविंदाने नांदताना दिसतात. संतांना लोकोद्धाराची तळमळ असल्यामुळे त्यांनी लोकजीवनाच्या सर्व स्तरांचे बारकाईने निरीक्षण केले होते. […]

प्रदूषणाभिमुख कार्यसंस्कृती!

कार्यसंस्कृतीवर परिणाम होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. अर्थात त्यांवर सहजासहजी एकमत होत नाही. प्रदूषित कार्यसंस्कृतीची व्याख्या संस्थेनुसार बदलत जाते आणि ती व्याख्या मतमतांतरे निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. मात्र धोक्याचे इशारे एकसारखे असतात. […]

‘श्रीमद्भगवद्गीता’ समजेल अशा मराठीत श्लोकबद्ध

ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश‚ आणि त्या अनुषंगाने अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान‚ यातून हा गीतोपनिषदाचा ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो. आजच्या प्रचलित मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशी प्रामाणिक मनोभावना यामागे आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. […]

1 13 14 15 16 17 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..