नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

शुभ दिपावली

२८ ऑक्टोबर पासून दीपावली ला सुरुवात होत आहे. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!! २८ ऑक्टोबर २०२४- वसुबारस ! गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! २९ ऑक्टोबर २०२४- धनत्रयोदशी ! धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! ३१ […]

सी. के. पींचा मत्स्याहार 

प्रस्तुत लेखात अन्नातील माशाचे महत्त्व, माशांच्या ताजेपणा ओळखण्याच्या पद्धती, मासे टिकविण्याच्या पद्धती व इतर माहिती, तांत्रिक बाबींचा जास्त उहापोह न करता व शास्त्रीय नावाचा वापर न करता येथे थोडक्यात देण्याचा प्रयत्न करीत आहे. […]

कायस्थी खाद्यजीवन इतिहास आणि संस्कृती

आज महाराष्ट्रातील कायस्थ समाज हा खानपान व खूश्ममीजाजचा शौकीन म्हणून ओळखला जातो. पण इतिहासात या मंडळींनी ज्या भूप्रदेशात वास्तव्य केलं तिथला इतिहास, निसर्ग, जीवनशैली व संस्कृतीचा गाढ प्रभाव या त्यांच्या खाद्यजीवनावर पडलेला दिसतो. त्याचा शोध खूप रोचक ठरतो. […]

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती (गीत  गणेश)

समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली. […]

शंख व त्याचे हिंदू धर्मातील महत्व

शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. शंख हे समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न आहे. […]

वसई : पेहराव संस्कृती

सुरका : वसईकडील मच्छिमार समाजसमूहाच्या पुरुषवर्गाच्या पेहरावातील एक मुख्य प्रकार म्हणजे ‘ सुरका ‘ होय . ‘ जसा देश तसा वेश ‘ याप्रमाणेच जसा व्यवसाय तसा पेहराव हेदेखील आलेच . मत्स्य व्यवसाय करणाऱ्या या लोकांना मासेमारीसाठी बोटीतून खोल समुद्रात जावे लागते . उंच बोटीत चढउतार करावा लागतो . तसेच जाळी टाकण्यासाठी पाण्यातही उतरावे लागते . […]

वसई : इतिहासातली आणि आजची

वसई तालुका ५२६ चौ . मैल इतका विस्तीर्ण आहे . पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा तर पश्चिमेला अरबी समुद्र , उत्तरेला वैतरणा नदी , दक्षिणेला नायगावची खाडी . पर्वताच्या रांगा आणि अरबी समुद्र यामध्ये वसलेला हा तालुका चहाच्या बशीसारखा ! त्यामुळे पोर्तुगिजांनी या प्रदेशाला ‘ बेकेम ‘ म्हटले तर ब्रिटिशांनी ‘ बॅसीन ‘ . पुढे स्वातंत्र्यानंतर वसई असे नामकरण झाले . या भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . बौद्ध राजे ते थेट पोर्तुगीज , ब्रिटिशांनी येथे राज्य केले . […]

कवडीची किंमत

कवडी (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर डाव टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो. जुन्या काळी कवडीचा उपयोग नाणे म्हणून करीत […]

साधीभोळी माणसं

गावातील अतिशय प्रामाणिक माणुस, दिलेला शब्द पाळणारा सत्यवचनी माणुस जर कोण असेल तर तो म्हणजे विष्णू गोमा..मी त्याला विष्णू नाना या नावानेच हाक मारतो.आता त्याचे वय जवळजवळ ८५ असेल. […]

नागपंचमी

ग्रामीण भागात पूर्वी व आतासुद्धा सणांना फार महत्व असते. हिंदू धर्मात पहिला सण नागपंचमी तर शेवटचा सण हा अक्षय तृतिया असतो..अक्षय तृतीया नंतर जवळ जवळ दोन अडीच महिने कोणताही सण नसतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अबालवृद्ध नागपंचमी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात . […]

1 2 3 4 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..