विवाह हा विषय व्यक्तिगत असला तरीही
त्यामुळे विवाह हा विषय व्यक्तिगत असला तरी त्याला सामाजिक रूप आहे. डोळेझाक करून चालणारा नाही. […]
मराठी संस्कृती विषयक लेख
त्यामुळे विवाह हा विषय व्यक्तिगत असला तरी त्याला सामाजिक रूप आहे. डोळेझाक करून चालणारा नाही. […]
सोळाव्या शतकात त्याकाळचा गोवा म्हणजे तिसवाडी, बार्देस व सालसेत या तालुक्यात जबरद्स्त प्रहार हिंदू संस्कृती वर झाला. जे काही हिदू संस्कृती म्हणून असेल ते नामशेष करायचा त्या काळी क्रिस्ती मशिनरी व राजकर्तां वीडाच उचलला होता. रुई गोम्स पेरेराच्या संशोधना प्रमाणे एकूण ५५६ (तिसवाडी ११६, बार्देस १७६ व सालसेत २६४) मोठी देवळ जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही देवतांच्या मुर्ती नदी पलिकडील शेजारच्या प्रदेशात स्थापित झाल्या […]
असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण? […]
आदी मानवाच्या गरजांची व त्यांच्या आपुर्तीचा इतिहास थोडक्यात बघु या, कारण तो फारच मनोरंजक आहे. पुर्वी मनुष्य ‘आज मिळाले ते आपले’ व ‘उद्याचे उद्या बघु’ अशा अवस्थेत होता. नंतर आपल्याजवळ जास्त असलेले दुसर्याला देऊ करुन त्याच्या बदल्यात त्याचे जवळचे आवश्यक ते आपण घ्यावे, नंतर वस्तुंची अनेकांशी अदलाबदली मग हळुहळु तराजु आला व अशा स्वरुपात पण मर्यादीत व्यवसाय सुरु झाला. विचारांचे आदान-प्रदान ,संवाद व दळणवळण सुकर झाल्यावर देवाण-घेवाणीसाठीचे माध्यम अशा स्वरूपात सर्वमान्य चलन (पैसे) आले व व्यापाराला सुरवात झाली. […]
या जगतात चार प्रकारचे कलह संभवतात. प्रथम कलह आपण आणि इतरेजन यांच्यात असू शकतो. दुसरा स्वतःशीच (आपुलाची वाद आपणाशी !) तिसरा आपण आणि बाह्य विश्व तर चौथा असू शकतो- आपण आणि ईश्वरात ! पहिले दोन प्रकार आपल्या दैनंदिन जीवनात दिसतात. मात्र उरलेले दोन्ही सहजासहजी दृश्य नसतात. त्यांना आपण सामाजिक कलह / व्यक्तिगत कलह /नैसर्गिक कलह अथवा आध्यत्मिक कलह असेही म्हणू शकतो. त्यातही सामाजिक आणि व्यक्तिगत कलह सामान्यतः नैसर्गिक आणि आध्यत्मिक कलहांचे परिणाम असतात. एक नक्की की या कलहांचे अस्तित्व असेपर्यंत कोणीही एकमेकांवर प्रेम करू शकणार नाही. […]
गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो…… […]
लोकसत्ताच्या ‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘संस्कृतीच्या वाटाघाटी’ हा प्रा. श्रद्धा कुंभोलकर यांचा १२नोव्हें. २०२० ला ( पुणे आवृत्तीत ) प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यानिमित्तानें प्रा, विजय काथरे यांची १३ नोव्हे. ची लोकसत्तामधील ‘लोकमानस’ या सदरातील प्रतिक्रियाही वाचली. सत्यनारायण व्रतावर आणखी माहिती मिळावी अशी इच्छा काथरे यांनी प्रगट केलेली आहे. त्यानुसार माझा हा लेख. […]
श्रीमद् शंकराचार्यांनी हे श्रीकृष्णाच्या विविध लीलांचा उल्लेख करणारे रसाळ स्तोत्र आर्या वृत्तात रचले आहे. अनुप्रास अलंकाराने ते विशेष नटले आहे. त्यामुळे ते अतीव गेयही आहे. ते वाचताना काही ठिकाणी ‘परब्रह्म निष्काम तो हा’ या संत नामदेवांच्या निर्गुणाचे सगुण रूप खुलवून सांगणा-या अभंगाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. फक्त त्यांचा बाळकृष्ण राजमंदिरात रांगतो, तर आचार्यांचा गोठ्यासमोरच्या पटांगणात ! […]
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे, की गीतेला ‘योगोपनिषद’ किंवा ‘गीतोपनिषद’ ही म्हणले जाते. तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला ‘उपनिषदांचे उपनिषद’ असेही म्हणले जाते. […]
श्रीमद् आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे हे अर्थगर्भ षटक होय. सहा श्लोकांचे हे काव्य अद्वैत वादाचा गाभाच म्हणावयास प्रत्यवाय नसावा. त्याला ‘निर्वाणषटकम्’ किंवा ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी (म्हणजे आत्मा) काय नाही हे सांगून शेबटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions