जपान देश आणि इथली माणसं ! (जपान वारी)
जपान या देशात 47 prefectures (राज्य म्हणूयात) आहेत. बाकी सविस्तर माहिती Google च्या कृपेने आजकाल एका Click वर उपलब्ध आहे. तर या देशाच्या चार मुख्य भूभागातील एक आहे “होक्काइदो”. “होन्शू” या मुख्य भूभागानंतरचा जपान मधला मोठा भुभाग. जपानच्या नकाशात पाहिलं तर सगळ्यात मोठा प्रदेश दर्शवणारा हा होक्काइदो. ‘जपान मधला स्वर्ग’ म्हटलं तरी अतिशयोक्ती वाटू नये इतका इथला निसर्ग सुखावणारा आहे. होक्काइदो ची राजधानी असलेले शहर म्हणजे “साप्पोरो” त्या बद्दल नंतर सविस्तर पाहुया… […]