सगुणस्वरूप विघ्नहर्ता – बालदिगंबर गणेश
परंपरेने गणेशाचं हे लोकप्रिय सगुणस्वरूप फार श्रद्धेनं जपलेलं आहे. असं असलं तरी गणपतीपूजनाला खरा राजाश्रय लाभला, तो पेशवे अधिकारपदावर आल्यावर. पेशवे गाणपत्य असल्याने त्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी गावोगाव असलेल्या गणपतीच्या देवळांचं वैभव वृद्धिंगत केलं. अष्टविनायकांच्या स्थानांना प्रतिष्ठा आली. असंच एक पुरातन स्थान आहे कर्जत तालुक्यातल्या ‘कडाव’ला. इथल्या बालदिगंबर गणेशाचे देऊळ फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. […]