राष्ट्रीय कॅलेंडर आणि इंग्रजी कॅलेंडर
राष्ट्रीय आणि इंग्रजी ही दोन्ही कॅलेंडर सूर्यावर आधारित आहेत. त्यामुळे त्यात १२ महिने आणि ३६५ दिवस आहेत. प्रत्येक दिवस हा तारखेने दर्शविला जातो आणि तारीख मध्यरात्री बदलते. ऋतूंशी मेळ रहावा म्हणून यामध्ये ४ वर्षातून १ दिवस जास्त घ्यावा लागतो. त्यामुळे या शृंखलेतील चौथे वर्ष हे ३६६ दिवसांचे असते. या कारणामुळे इंग्रजी कॅलेंडर सुटसुटीत आहे. वरील सर्व गोष्टी राष्ट्रीय कॅलेंडरलाही लागू असल्यामुळे राष्ट्रीय कॅलेंडर ही वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत आहे. राष्ट्रीय कॅलेंडरचा वेगळेपणा आता पाहू. […]