नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

वेदकाळात ब्राह्मणवाद : एक पोकळ कल्पना

हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच. […]

श्री गणेश चतुर्थी पूजेमागील विचार व आशय

गणपती ही विद्येची व सकल कलांची आराध्य देवता,गणांचा अधिपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.प्रतिवर्षी येणा-या गणेश उत्सवाची प्रतीक्षा सर्व भक्त आतुरतेने करीत असतात. गणेशाची प्रतिष्ठापना आणि त्यामागील आशय समजून घेतला तर या उत्सवाची खुमारी अधिकच वाढेल. […]

स्त्रियांच्या रजोदर्शन काळातील अस्पर्शता आणि त्याविषयीच्या भूमिकेमध्ये बदलाची आवश्यकता

मासिक पाळी ही स्त्रियांच्या जीवनातील एक शारीरिक नैसर्गिक गोष्ट आहे. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेच्या दृष्टीने विचार करता मासिक पाळीचे महत्व स्त्रीच्या आयुष्यात महत्वाचे आहे.नवीन जीवाला जन्माला घालण्याची ही क्षमता स्त्रियांचे पुरुषांपेक्षा असेलेले वेगळेपण दाखविते.असे असले तरी हिंदू परंपरेमध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अस्पर्श किंवा अशुद्ध समजले जाते. सदर शोधनिबंधात या विषयी काही नवा विचार मांडण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न […]

अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय

परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो.यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत. […]

गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा

गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही’ मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. […]

जागतिक साडी दिवस

साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो.  […]

सीकेपी तितुका मेळवावा

महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील जाती शोधून त्यांना एकमेकांविरुद्ध  झुंजविण्याचे राजकारण सुरु आहे. अशा वेळी दुसऱ्या जातीबद्दल काही चांगले लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. ही जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ! म्हणजेच सीकेपी समाज !! […]

मनाची श्रीमंती

माझ्यामते मुबलक पैसा कमविला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असे नाही. खरं तर फक्त पैसा कमविला की तो “पैसेवाला” नक्कीच होतो, मात्र “श्रीमंत” होतोच असं नाही. कारण प्रत्येक “श्रीमंत” हा पैसेवाला असतोच परंतु प्रत्येक “पैसेवाला” हा श्रीमंत असतोच असे नाही. […]

दिवाळी दिवाळी आ ssss ली 

दरवर्षीप्रमाणे ‘दिवाळी’ आली, पण ती अगदी आजच आली आहे याच्यावर विश्वासच बसत नाही, मला भिंतीवरच्या ‘कालनिर्णय’ वरून समजलं. पण तरीही माझ्या ‘झोपी गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या’. […]

असा पदर पदर

असा पदर पदर, कुयरी नि मोराचा.. दिसे भर्जरी साजरा, गुजराती पद्धतीचा..!! माझं बऱ्याच लग्नसमारंभातून, सोशल गॅदरींगमधून किंवा अशाच काही विशेष घरगुती सोहळ्यांना जाणं होत असतं. बऱ्याच वर्षांपासून मला असं दिसतं की, अगदी फेटेबंद मराठमोळा असलेल्या या कार्यक्रमातून बऱ्याच कुमार-तरुण ललना मला गुजराती पद्धतीची साडी नेसून दिसतात. काही ठिकाणी तर नववधु किंवा सत्कारमु्र्ती असलेली स्त्री ही गुजराती […]

1 31 32 33 34 35 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..