नऊवारी लुगडं..
‘लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ‘पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल. मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते. वास्तवीक नव्वार किंवा नऊवार हे कापडाच्या लांबीचं माप आहे, नेसायची पद्धत […]