नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

पार्सल संस्कृती

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे श्र्लोक म्हणत घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची आपली भारतीय संस्कृती कधी काळी होती असे म्हणण्याची आता वेळ आलेली आहे असे म्हणले तर फारसे वावगे होणार नाही. पण या पार्सल संस्कृतीला नावे ठेवण्यापेक्षा ती आता बहुतेक शहरात एक आवश्यक बाब बनली आहे हे तितकेच खरे आहे. व आपण सर्वांनीच ती […]

सन आयलाय गो आयलाय गो, नारली पुनवेचा @ वरली कोलीवाडा..

काल इतक्या वर्षात पहिल्यांदाच कोळी बांधवांचा ‘नारली पुनवे’चा सण साजरा होताना प्रत्यक्ष पाहिला. आता पर्यंत नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा करातात, ते टिव्हीवर पाहिलं होतं. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून दुसऱ्या दिवसापासून मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव आपली होडी दर्यात ढकलतो, येवढंच शाळेच्या पुस्तकांतून नाॅलेज मिळालं होतं. या निमित्ताने ‘कोळी डान्स’ होतो, हे ज्ञान […]

रामायणाचे महत्व !

 रामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्यामाणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. तेकधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूसया तत्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही. […]

नामाची तिजोरी । प्रेमाची रोकड ॥

स्वामी भक्तांनी, फसव्या व बाजारू लोकांपासून नेहमीच सावध राहावे व आपली फसवणूक टाळावी. असा संदेश आपल्याला आजच्या अभंगातून मिळणार आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी स्वामी महाराजांच्या नावे श्रद्धेचा बाजार मांडून स्वामी भक्तांना लूबाडण्याचे काम तर केलेच आहे, शिवाय स्वामींचा ही खुप मोठा अक्षम्य अपराध केला आहे. अशा कपाळकरंट्या व स्वामी सारखे शाश्वत सत्य सोडून ईतर तुच्छ गोष्टिंच्या मागे लागलेल्या मतिभ्रष्ट लोकांना ही यापासून परावर्तीत करण्याचा प्रांजल प्रयत्न आनंदनाथ महाराजांनी आपल्या पुढील अभंगातून केला आहे. […]

आध्यात्माची आवश्यकता

आध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर -चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी  दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो.  […]

भगवत् नामातून – मुक्तीकडे

ईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला.  या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील. […]

मंगलमूर्ती श्री गणेशा विषयी अमंगल गैरसमज !

कार्य कुठलेही असो, सर्वात अगोदर पूजा होते ती, मंगलमूर्ती श्री गणेशाची. मंगलमूर्ती शिवाय प्रत्येक कार्य हे अधुरेच ! अशी ही श्री गणेशाची ख्याती आहे. श्री गणेश हा मंगलमूर्ती तर आहेच, त्यासोबतच बुद्धिची देवता म्हणूनही सर्व ख्यात आहे. […]

शिष्यत्व जपा, गुरु ठायी ठायी आहेत..

गुरू कोणाला न्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहीलेला आहे. गुरुचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो, प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो, हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व आणखी काही जवळचे मित्र-परिचित हे आपले […]

युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा ! असे म्हटल्यानेबहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही. सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, आजच्या संगणकाच्या प्रगत युगात आध्यात्मासारख्या जुनाटव मागासलेल्या विषयाला पुढे आणून मी युवकांची दिशाभूल करत आहे. किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. आदि आदि. […]

श्री स्वामी समर्थ पंथाचे श्रेष्ठत्व !

अनादि कालापासून चालत आलेल्या सृष्टिचा गाडा सुरळित चालविण्यासाठी परमेश्वराने नानाविध अवतार धारण करुन जगताला सन्मार्गाला लावण्याचे कार्य केले. धर्माला आलेली ग्लानी दुर करून, सज्जनांचा सांभाळ केला. प्रंसगानूरुप घेतलेल्या अशा अनेक अवतारावरून त्या त्या देवतेची उपासना सुरू झाली. या उपासनेचा क्रम असाच पुढे वाढत जाऊन, त्यातून मग अनंत पंथ, असंख्य संप्रदाय निर्माण झाले. या असंख्य संप्रदायाचे पुढे अगणित पंथ प्रमुख, धर्मगुरू निर्माण झाले. पुढे याच प्रमुखांचे, धर्मगुरूंचे वारस आणि अनुयायी वाढत गेले. […]

1 34 35 36 37 38 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..