श्री नृसिंह अवतारकथा
प्रल्हादासी करितो नमन बालक असुनी महान अणुरेणूंत असे भगवान दाखवूनी देई जगाला ।।१।। बघावी सृष्टी ठेऊनी संत द्दष्टी त्यासी दिसेल जगत् जेठी सर्व ठिकाणीं ।।२।। प्रल्हादाचे तत्वज्ञान प्रभुमय सारे जग् जीवन त्यासी घ्यावे ओळखून श्रद्धा द्दष्टीनें ।।३।। अपूर्व प्रभू भक्ति उन्मत्त असूरी शक्ति संघर्षकथा होती भक्त प्रल्हादाची ।।४।। बहूत महान वीर प्रभुपुढे कोण टिकणार परि प्रभूसीच […]