श्री दत्तगुरु जन्मकथा
ब्रह्मा विष्णु महेश तीन रुपें एक अंश विश्वाचे तुम्हीं ईश दत्तात्रय रुपांत ।।१।। उत्पत्ति स्थिति लय तीन कार्ये होत जाय विश्वाचा हा खेळ होय तुझ्या आज्ञेने ।।२।। तीन देवांचे रुप निराळे एकत्र होती सगळे दत्तात्रय होऊन अवतरले ह्या जगती ।।३।। दत्त जन्मकथा आनंद होई वदता ग्रहण करावे एकचिता सकळजण हो ।।४।। तिन्ही लोक फिरुनी नारद आले […]