नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

कुटुंब आणि आजची स्त्री

कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथंम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत एवढ्या त्या एकरुप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतू स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. माझे मालवणीतून अर्थवाही कविता करणारे मालवण स्थित कविमित्र श्री. विनय सौदागर यांनी […]

देवपूजा, अभिषेक आणि रिसायकलींग

एका देवळात एका रिसायकल होणार्‍या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !! […]

नमस्काराचे महत्व

जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. […]

शनिकथा व इतिहास

आपल्या दैनदिन जीवनात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. तसेच शनी सौर जगतातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे. याला ज्योतिष शास्त्रात अशुभ मानले जाते. आधुनिक खगोल शास्त्रानुसार शनीचे पृथ्वी पासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे. याचा व्यास १ अब्ज ४२ कोटी ६० लाख किलोमीटर इतका आहे. […]

पद्मावती – भाग दोन आणि जास्त महत्वाचा

आज सकाळी मी पोस्ट केलेल्या ‘पद्मावती’ या लेखातील श्री. संजय लीला भन्सालींच्या वडीलांचा मी केलेला उल्लेख बहुसंख्यांना खटकला, हे चांगलं की वाईट हे नंतर ठरवू, पण माझ्या लेखातून माझ्याकडून ती चुक का ‘झाली’ हे सांगणं माझं कर्तव्य ठरतं. […]

पद्मावती

मला वाटतं, आपल्याला भन्सालींसारख्या नतद्रष्टांना धडा शिकवण्यासाठी, आपण त्यांच्या चित्रपटावर वा कलाकृतींवर अशी बंदीची मागणी न करता, असे चित्रपट आपण कोणी पाहायचेच नाहीत असं ठरवावं. लोकशाहीत कोणत्याही विषयावर चित्रपट काढायला किंवा भाष्य करायला बंदी नाही. याला अविष्कार स्वातंत्र्य असं म्हणतात. त्याच लोकशाहीत तो चित्रपट पाहायलाच हवा असंही बंधन नाही. मग आपल्या हातात हे घटनात्मक हत्यार असताना, आपण बंदीची मागणी का करतोय हे अनाकलनीय आहे. […]

करवा चौथ

दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात. […]

जुन्या मराठी पंगतीतील श्लोक आणि मजेदार गाणी ( भाग २ )

महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची  खूप जुनी प्रथा आणि जेवण सुरु असतांना देवाचे आणि सुसंगत विषयांवरील संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे, त्यातील वैविध्य याबद्दल मी या आधीच्या भागात लिहिलेले आपण वाचले असेलच. तेथे म्हटला जाणारा अर्ज आपण पहिला तशी एक निमंत्रण पत्रिका ( त्यावेळी कुंकुम पत्रिका, कुंकोत्री, कंकोत्री इत्यादी म्हटले जाई ) देखील असायची. चि. सौ. कां. जिलेबीबाई हिचा शुभविवाह चि. मठ्ठेराव यांचेशी …. इत्यादी […]

जुन्या मराठी पंगतीतील श्लोक आणि मजेदार गाणी !

महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची प्रथा तशी खूप जुनी ! घरातील शुभकार्य,देवाचा सार्वजनिक उत्सव यापासून ते अगदी मृत व्यक्तीचे तेरावे अशा कारणांसाठी जेवणावळी होत असत.बरेचदा या जेवणावळी जातीनिहाय, कुटुंबनिहायसुद्धा असायच्या . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीयता मोडण्यासाठी समाजातील सर्व जातींच्या लोकांबरोबर, पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्या एकत्र जेवणावळीही केल्या.७०/ ८० वर्षांपूर्वी अशा जेवणावळीत भांड्यांचा आवाज, एकमेकांशी कुजबुज, […]

आली दिवाळी..दिवाळी पाडवा..

वर्षभर आतुरतेने वाट पाहात असलेल्या दिवाळसणाचा, बघता बघता तिसरा दिवस उजाडला. आजचा दिवस पाडव्याचा. साडेतिन मुहुर्तांपैकी आजचा दिवस हा अर्ध्या मुहूर्ताचा. आजची कार्तिक शुद्ध प्रतिपदा ‘पाडवा’ नांवानेच ओळखली जाते. महाजनांच्या प्रतिपदा या शब्दाचं बहुजनांनी केलेलं सुलभीकरण म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द. भाद्रपदा’चं कसं ‘भादवा’ केलं, अगदी तस..! आजच्या दिवसाला ‘बलीप्रतिपदा’ असंही म्हणतात. शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी […]

1 39 40 41 42 43 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..