आठवणीतील दिवाळी..
माझ्या लहानपणीची दिवाळी खुप छान असायची. माझा लहानपण म्हणजे मला समजू लागल्यापासून समज येईपर्यंतचं वय. नेमकं सांगायचं म्हणजे ६८-६९ सालापासून ते ८०-८५सालापर्यंतचा काळ. मी तेंव्हा अंधेरी पूर्वेच्या पंपहाऊस येथील एका बैठ्या चाळीत राहायचो. तेंव्हा चाळीच असायच्या आणि दुसरा वर्ग थेट बंगला. बलाक, फ्लॅट अद्याप जन्मले नव्हते. आणि चाळीला चाळच म्हणत, ‘स्लम’ हा तुच्छतादर्शक शब्द अवतरला नव्हता. […]